Pune crime: पुणे पुन्हा हादरलं! आधी लाथाबुक्क्यांनी मारहाण मग चाकूचा धाक दाखवत बलात्कार; अंगावरील सोनंही चोरलं

Crime against women and robbery: पुण्यातील शिरूर तालुक्यातील कारेगावमधील एका घरात तरूणीवर बलात्कार करून घरात दरोडा टाकल्याची संतापजनक घटना घडली आहे.
pune crime update
pune crime updatesaam tv
Published On

पुणे स्वारगेट बस डेपोत झालेल्या २६ वर्षीय तरूणीवर अत्याचार प्रकरण ताजे असतानाच आणखी एका घटनेमुळे पुणे हादरलं आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगावमधील एका तरूणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.

नंतर तिच्या अंगावरील सोनं देखील लुटलं. या प्रकरणी २ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगावात एक संतापजनक घटना घडली आहे. एका तरूणीला आधी चाकुचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर दोन आरोपींनी तरूणीवर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरले. या धक्कादायक घटनेमुळे पुणे पुन्हा हादरलंय.

pune crime update
Ghatkoper Crime: नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं

नेमकं काय घडलं?

शिरूर तालुक्यातील कोरेगावात एक युवती आपल्या मामे भावासह गप्पा मारत बसली होती. गप्पा मारत असताना त्या ठिकाणी दोन जण आले. दोन्ही आरोपी दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. दारूच्या नशेत त्यांनी आधी तरूणीला चाकुचा धाक दाखवला. नंतर दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

pune crime update
Political News: 'विधानसभेचं रूप राहुल नार्वेकरांमुळे बदललं', शरद पवार गटातील बड्या नेत्यांकडून कौतुक

लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर दोघांनी तरूणीवर लैंगिक अत्याचार केला. बलात्कार केल्यानंतर नराधमांनी तरूणीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली असून, दोन्ही आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com