Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune News: घटस्फोटासाठी पत्नीची पोलिसात तक्रार; चिडलेल्‍या पतीने पेटविल्‍या परिसरातील पंधरा गाड्या

घटस्फोटासाठी पत्नीची पोलिसात तक्रार; चिडलेल्‍या पतीने पेटविल्‍या परिसरातील पंधरा गाड्या

साम टिव्ही ब्युरो

पुणे : लग्‍नाला सहा वर्ष झाले होते. परंतु, पती काही काम करत नसून घरीच बसून असतो. यामुळे त्रस्‍त पत्‍नीने (Pune News) पतीपासून सुटका मिळावी याकरीता पोलिसात (Police) घटस्‍फोटासाठी तक्रार दाखल केली. पतीला ही बाब समजल्‍यानंतर संतापात त्‍याने पत्‍नीच्‍या दुचाकीसह परिसरातील दहा दुचाकी व चार मोठ्या गाड्या पेटवून दिल्‍या. (Letest Marathi News)

कोंढव्यातील अश्रफनगर परिसरातील अलिप टावर समोरील हा धक्कादायक प्रकार झाला आहे. आरोपी टेरेन्स आणि त्याची पत्नी एलिना जेकेब यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. काही वर्ष चांगली गेली. मात्र लग्नानंतर टेरेन्‍स हा कोणताही कामधंदा करत नव्हता. पत्‍नी वारंवार सांगत असताना देखील पती कामाला जात नव्‍हता. म्हणून पत्नीने त्याच्या विरोधात पोलिसांमार्फत घटस्फोटासाठी अर्ज दिला.

पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दाखल केली. पतीला हे समजल्‍यानंतर घटस्फोटाच्‍या अर्जावरून चिडलेल्या जॉन याने पत्नीच्या दुचाकीसह परिसरातील चारचाकी कार, रिक्षा आणि इतर वाहन पेट्रोल टाकून पेटवून जाळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्‍या कोंढव्यात खळबळ उडाली आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrabhaga River Flood : पंढरपुरात ४०० नागरिकांचे करणार स्थलांतर; चंद्रभागेच्या पुराने कुटुंब बाधित

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

SCROLL FOR NEXT