Sachin Sanap announced as Shiv Sena-backed candidate in Pune saam tv
महाराष्ट्र

पुणे विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट! शिंदे गटाकडून सचिन सानप यांना उमेदवारी शिवसेनेचा भाजपला 'दे धक्का'

Pune Legislative Council Polls: पुणे विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेने सचिन सानप यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर केले आहे. भाजपच्या कौस्तुभ गावडेंच्या उमेदवारीमुळे महायुतीतील राजकीय चुरस वाढली आहे.

Bharat Jadhav

  • पुणे विधान परिषद निवडणुकीत नवी राजकीय घडामोड समोर आली आहे.

  • शिंदे गटाच्या शिवसेनेने सचिन सानप यांना पुरस्कृत उमेदवार

  • महायुतीतील राजकीय चुरस वाढली

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीमध्येच कुस्ती पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न सत्तेत सहभागी असलेले घटकपक्ष करत आरहेत. या निवडणुकीत अमरावतीच्या घडामोडीचे पडसाद पुण्यात उमटताना दिसत आहेत. पुण्यात भाजपच्या कौस्तुभ गावडेंविरोधात शिवसेनेने आपला उमेदवार उभा केलाय. शिंदे गटाकडून सचिन सानप यांना पक्षाचे पुरस्कृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच महायुतीत घमासान सुरूयय. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयासाठी विजयासाठी भाजपनं कंबर कसलीय. सचिन सानप हे अपक्ष उमेदवार असल्याचं सांगतानाच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते कौस्तुभ गावडेंच्या विजयासाठी काम करतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी केला होतं. मात्र शिवसेनेनं या निवडणुकीत वेगळा निर्णय घेत सचिन सानप यांना पुरस्कृत उमेदवार घोषित केलंय. यामुळं महायुतीतील धुसफूस समोर आलीय.

महायुतीच्या बिघाडीचं कारण काय?

पुण्यातील महायुतीमधील बिघाडीला अमरावती शिक्षक मतदारसंघातील बंडखोरी कारण ठरलं. अमरावतीमध्ये भाजपचे ३ बंडखोर अद्यापही रिंगणात आहेत. या मतदारसंघात शिवसेनेनं विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना उमेदवारी दिलीय. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी देखील बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय.

तिवसा मतदारसंघात भाजपच आमदार राजेश वानखेडे यांचे मेहुणे शेखर भोयर, भाजप आमदार उमेश यावलकर यांचे निकटवर्तीय सुमित पवार आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे यांनी बंडखोरी केल्याचं दिसतंय.

शिवसेनेच्या आदेशात नेमकं काय म्हटलंय?

सचिन सानप यांच्या उमेदवारीसंदर्भातील अधिकृत परिपत्रक शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील विधानपरिषद निवडणूक २०२६ साठी सचिन नवनाथ सानप यांना शिवसेना पक्षाचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras Wishes : आली दिवाळी! मराठी, हिंदी आणि इंग्रजीत धनतेरसचे प्रियजनांना पाठवा खास मेसेज

Dhanteras 2026 : धनतेरसला पैसे उधार दिले तर घरात येते गरिबी? काय सांगते धार्मिक मान्यता?

ZP अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; घरात सापडलं अडीच किलो सोनं, 11 किलो चांदी

दिवाळीची मिठाई खाताना सावधगिरी बाळगा! मिठाईला चांदीचा वर्ख की अल्युमिनियम फॉईल?

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार; NDA मधील मित्रपक्षाचा भाजपाला इशारा

SCROLL FOR NEXT