Haveli News Saam tv
महाराष्ट्र

Pune News : गाडीच्या कारणावरून वडील रागावले; नववीतील मुलाने उचलले टोकाच पाऊल

Pune News : वडील शिवाजीनगर येथील एका खाजगी बँकेत नोकरीला आहेत. मंगळवारी घरातील सर्वजण आपआपले घरातील काम करीत होते

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : वडील रागावल्याच्या किरकोळ कारणावरून नववीची परीक्षा दिलेल्या १६ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा (Pune) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दत्तवाडी परिसरात मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.  (Breaking Marathi News)

श्रीराज उर्फ (टिंग्या) संतोष सोनावणे (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. श्रीराज हा कोरेगाव मूळ येथील अमर एज्युकेशन येथील शाळेत शिक्षण (education) शिकत होता. त्याने नुकतीच नववी परीक्षा दिली होती. त्याचे आई- वडील व बहिण असे चौघेजण उरुळी कांचन येथील दत्तवाडी परिसरात राहतात. वडील शिवाजीनगर येथील एका खाजगी बँकेत नोकरीला आहेत. मंगळवारी घरातील सर्वजण आपआपले घरातील काम करीत होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वडील संतोष सोनावणे हे गाडीच्या कारणावरून श्रीराज याला रागावले व ते बाहेर गेले होते. यावेळी श्रीराज हा घराच्या शेजारी असलेल्या पत्रा शेडडमधील अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे त्याच्या आईला दिसून आले. यावेळी श्रीराज याची आई सविता सोनावणे यांनी साडेसात वाजण्याच्या सुमारास सतीश सोनावणे यांना फोनवरून दिली होती. याप्रकरणी सतिष साहेबराव सोनावणे (वय ५१) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. श्रीराज याने आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नसून उरुळी कांचन (Police) पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

नागपूरच्या MIDC मधील पाण्याची टाकी कोसळली, ३ जणांचा मृत्यू, अनेकजण मलब्याखाली

RCF Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ५५० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Flax seeds: स्किन-हेअर केअर आणि डायबिटीजसह 'हे' आजार होतील कायमचे दूर, रोज सकाळी एक चमचा खा 'या' बिया

Ajit Pawar : नंदुरबारला पावरफुल पालकमंत्री मिळणार? अजित पवारांच्या नावाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT