Zomato Delivery : झोमॅटोच्या माध्यमातून दारू विक्रीचा अजब प्रकार; संभाजीनगरात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Sambhajinagar News : झोमॅटोद्वारे जेवण किंवा नाश्त्याची ऑर्डर देऊन अवघ्या काही मिनिटात दिलेली ऑर्डर घरपोच दिली जात असते
Zomato Delivery
Zomato DeliverySaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : घरबसल्या जेवण किंवा नास्ता मागविण्यासाठी काही कंपन्या शहरांमध्ये कार्यरत आहेत. यातील एक झोमॅटो देखील आहे. आतापर्यंत (Zomato) झोमॅटोच्या माध्यमातून फक्त फूड डिलेवरी होत असल्याच ऐकलं असेल. परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhaijnagar) झोमॅटोच्या माध्यमातून बेकायदेशीर दारूची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Maharashtra News)

Zomato Delivery
Sambhajinagar Corporation : संभाजीनगरच्या विकास आराखड्यावर ५ हजार आक्षेप; चुकीच्या पद्धतीने टाकले आरक्षण

झोमॅटोद्वारे जेवण किंवा नाश्त्याची ऑर्डर देऊन अवघ्या काही मिनिटात दिलेली ऑर्डर घरपोच दिली जात असते. याकरिता अनेकजण याचा वापर करत आहेत. हॉटेल, दुकानदारांशी झोमॅटोने याकरिता टाईप केलेला असतो. मात्र याद्वारे काही अंमली पदार्थाची ऑर्डर देऊन ते मागविता येन नाही. मात्र संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील एका हॉटेल चालकाने झोमॅटोच्या माध्यमातून दारू विक्री करण्याचा नवीन फंडा शोधून काढला.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Zomato Delivery
Akola Crime : पोलिसांच्या मारहाणीत संशयित आरोपीचा मृत्यू; पीएसआयसह ३ पोलिस कर्मचाऱ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल

महागड्या दारूसह एकजण ताब्यात 

दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) या संदर्भात एक मोठी कारवाई करून १ आरोपीला महागड्या दारूच्या बॉटलसह ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान झोमॅटोच्या माध्यमातून दारूची तस्करी होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळताच आरोपीच्या मुस्क्या आवळल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com