Pune Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Pune Cyber Crime: ऑनलाईन जेवण मागवताय तर सावधान..महिलेला ४०० रुपयांची थाळी पडली २ लाखला

ऑनलाईन जेवण मागवताय तर सावधान..महिलेला ४०० रुपयांची थाळी पडली २ लाखला

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

पुणे : खवय्यांनो तुम्हाला किती ही भूक लागली असेल तर जरा धीर धरा तुम्ही जिथून ऑनलाईन जेवण मागवत आहात त्याची एकदा खात्री करा नाहीतर जेवण पण गेलं आणि पैसे पण गेले अशी वेळ तुमच्यावर पण येऊ शकते. 'एकावर एक थाळी फ्री' देतो असे सांगत लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे (Cyber Crime) धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. पुण्यातील (Pune News) एका महिलेला प्रसिद्ध असलेली ४०० रुपयांची एका नामांकित हॉटेलची थाळी तब्बल २ लाख रुपयांना पडली. (Maharashtra News)

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सायबर गुन्हेगारी थांबायचं काही नाव घेत नाही. फसव्या लोन ॲपने आधीच लाखोंचा गंडा पुणेकरांना वेगवेगळ्या घटनांतून घातला असतानाच आता नामांकित हॉटेलचे नाव वापरून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा नवीन फंडा या चोरट्यांनी सुरू केला आहे. पुण्यातील ही पहिली घटना नसून या प्रसिद्ध हॉटेलचे नाव वापरून गेल्या १ वर्षात ही पाचवी घटना आहे. कोरेगाव पार्क, येरवडा, बाणेर यासारख्या अनेक ठिकाणी याच हॉटेलचे नाव वापरत सायबर चोरट्यांनी अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

बँक डिटेल्‍स दिले अन्‌ खाते खाली

पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलची ४०० रुपयांची थाळी एकावर एक फ्री देण्याची फसवी ऑफर देऊन भामट्यांनी एका महिलेला तब्बल दोन लाख रुपयांना गंडा घातला आहे. पुण्यात महिलेने एका नामांकित हॉटेलची जाहिरात फेसबुकवर पाहिली आणि संपर्क साधला. एक वर एक थाळी फ्री असल्याचे या जाहिरातीत नमूद असल्यामुळे त्या महिलेने दिलेल्या क्रमांकावर फोन करत ऑर्डर केली. ऑर्डरचे पेमेंट करण्यासाठी केरळमधील सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांच्या वडिलांना क्रेडिट कार्ड आणि बँकेचे डिटेल्स मागितले. आपण खरोखरच हॉटेलच्या मॅनेजरशी बोलतो आहे; असं वाटल्यामुळे त्यांनी सगळ्या बँकचा डिटेल्स दिल्या. मात्र काही वेळातच त्यांच्या बँकेतून तब्बल एक लाख 99 हजार रुपये गायब झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : ओबीसी आरक्षण बचावासाठी टोकाचे पाऊल; बीड जिल्ह्यातील घटनेने खळबळ

Maharashtra winter : गरम कपडे तयार ठेवा! यंदा महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी, तज्ज्ञांनी सांगितलं कारण, वाचा सविस्तर

Health facts: उभं राहून पाणी प्यायल्याने खरंच गुडघेदुखीचा त्रास होतो? वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्य काय, वाचा!

Rented House : रेंटवर राहणाऱ्यांच्या कामाची बातमी, जाणून घ्या तुमचे हक्क आणि कायदेशीर नियम

आई अन् मुलानं १३ व्या मजल्यावरून उडी मारली; पती झोपलेला असताना आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमधून माहिती उघड

SCROLL FOR NEXT