
पंढरपूर : पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अन्नछत्रात गॅस (Gas) गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. आज (Pandharpur) सकाळी ही घटना घडली असून प्रसंगावधानामुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली आहे. (Tajya Batmya)
पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात माऊलीच्या दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांसाठी जेवण तयार केले जात असते. यासाठी स्वतंत्र अन्नछत्र असून या अन्नछत्रात सकाळी दोन हजार भाविकांचे जेवण बनवले जाते. सकाळपासून जेवण बनविण्यास सुरवात होत असते. याच दरम्यान आज सकाळी अन्न बनविण्याचे काम सुरू असताना गॅस सिलेंडरमधून गॅस गळती झाली. यावेळी अचानक (Vitthal Rukhmini Temple) भडका देखील उडाला होता. यामुळे काहीसा गोंधळ उडाला.
प्रसंगावधान राखल्याने दुर्घटना टळली
सकाळी भाविकांसाठी जेवण बनविले जात असताना गॅस सिलेंडरमधून अचानक गॅस लीक झाला. यावेळी शेजारील शेगडी सुरू असल्याने सिलेंडरमध्ये भडका उडाला. यामुळे स्वयंपाकींमध्ये गोंधळ उडाला होता. मात्र येथील काही आचाऱ्यानी प्रसंगावधान राखत आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.