beed, Dhulivandan 2023 saam tv
महाराष्ट्र

Dhulivandan 2023 : प्रेम विवाह करणाऱ्या जावयाची पहिल्यांदाच गावातून वाजत गाजत मिरवणूक (पाहा व्हिडिओ)

अनेक वर्षांची परंपरा आज टिकली. त्यामुळे गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

विनोद जिरे

Beed News : जावयाची घोड्यावरील मिरवणूक तर सर्वांनी पाहिली असेल मात्र बीडच्या (beed) केज तालुक्यातील विडा गावात जावयाची मिरवणूक काढली जाते ती पण चक्क गाढवावर. लाडक्या जावयाला गाढवावर बसून मिरवताना अख्ख गाव डीजेच्या तालावर डान्स करतं, यात महिलाही मागे राहत नाहीत. अविनाश करपे हे जावई यंदा परंपरेचे मानकरी ठरले आहेत.

सासरवाडीत जावयाचा मान मोठा पण गाढवावर बसलेला जावई आणि त्यांच्यासमोर नाचणारे मेहुणे मंडळी पाहिल्यावर ही मिरवणूक आहे का धिंड आहे ? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मात्र बीडच्या (beed) विडा गावात वाजत गाजत गाढवावरती बसून मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. अखंडित असलेल्या या परंपरेत आतापर्यंत तब्बल 90 जावयांना गाढवावर बसून वाजत गाजत गावात मिरवले आहे.

त्यामुळे धुळवड म्हटलं की या गावचे जावई भूमिगत होतात. मात्र शेर असलेल्या जावयास मेहुणे मंडळी सव्वाशेर भेटते आणि पातळातून शोधून काढते. या शोध मोहिमेत गावातील महिला देखील सहभागी होतात. आणि मग सुरू होते जावयाची गदर्भ स्वारी. यावर्षी गाढवावर स्वार होण्याचा मान जवळबनचे जावई अविनाश करपे यांना मिळाला आहे. युवराज पटाईत यांचे ते लाडके जावई आहेत. (Maharashtra News)

हसत खेळत परंपरेचा स्विकार

आपल्या नवऱ्याची माहेरात गाढवावरती मिरवणूक काढली जाते म्हटल्यावर पत्नीच्या भावना काय असतील. प्रेम विवाह केल्यामुळे गावात घोड्यावरून तर मिरवणूक काढली नाही. आज गाढवाचा मान मिळाला. पाठीमागून चालत आलेली परंपरा असल्यामुळे हसत खेळत याला स्वीकारलं जातं.

...आता गोड वाटतंय

पाच वर्षे यांना सापडलं नव्हतो, यावर्षी देखील सापडत नव्हतो. मात्र पहाटेची येऊन घरात साप निघाला आहे असा आरडाओरडा केला. त्यामुळे बाहेर यावं लागलं. सर्व मेव्हणे मंडळींनी पकडलं. तेव्हा नाही म्हणता आलं नाही. इच्छा नसतानाही गाढवावर बसावं लागलं. मात्र आता गावकऱ्यांनी अंगठी देऊन संपूर्ण पोशाख केल्याने सुरुवातीला गाढवावर बसलेले नाराज झालेले जावई देखील आनंदाने हसू लागले. आता गोड वाटतंय असं अविनाश करपेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT