Pandharinath Phadke : अंबरनाथ गोळीबार प्रकरण; पंढरीनाथ फडकेच्या अडचणीत वाढ, वाचा नेमकं काय झालं काेर्टात

पंढरीनाथ फडके बैलगाडी शर्यतीच्या वेळीस नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.
Ambernath, Pandharinath Phadke
Ambernath, Pandharinath Phadkesaam tv

Ambernath : अंबरनाथ मध्ये नोव्हेंबर महिन्यात बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंदाधुंद गोळीबार झाला होता. या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी असलेले महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके (Pandharinath Phadke Latest News) याचा जामीन विशेष मोक्का न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे फडकेच्या अडचणी वाढ झाली आहे. (Breaking Marathi News)

Ambernath, Pandharinath Phadke
Amalaki Ekadashi 2023 : सापडणार का पंढरीचा चाेर ? सजावटीची एक टन द्राक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून गायब (पाहा व्हिडीओ)

अंबरनाथ मध्ये १३ नोव्हेंबर रोजी बैलगाडा शर्यतीच्या वादातून पनवेलचे पंढरीनाथ फडके यांच्या गटाने कल्याणच्या राहुल पाटील गटावर अंदाधुंद गोळीबार केला होता. याप्रकरणी पंढरीनाथ फडके यांच्यासह एकूण ३२ जणांवर हत्येचा प्रयत्न, आर्म्स ऍक्ट यासह मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.

Ambernath, Pandharinath Phadke
Ambernath : अंबरनाथ गोळीबार प्रकरण राजकीय वैमनस्यातून; पंढरीनाथ फडके अटकेत, ३२ जणांवर गुन्हा दाखल

त्यानंतर फडके यांची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली होती. याबाबत फडके यांच्या वकिलांनी ठाण्याच्या विशेष मोक्का न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे फडके हे आता जामिनासाठी उच्च न्यायालयात (high court) जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com