महाराष्ट्र

Maratha Reservation: मनोज जरांगेच्या भेटीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांचा मराठा आरक्षणावरून फडणवीसांवर गंभीर आरोप

Bharat Jadhav

देवेंद्र फडणवीस सरकारला मराठा आरक्षण टिकवता आलं नसल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जरांगेच्या भेटीनंतर केलाय. आमचं सरकार गेलं आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं. त्यांनी मराठा समाजाचे आरक्षण टिकवलं नाही, असा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय.

आज काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरांगे यांची भेट घेण्याची इच्छा होती. आज तो योग आला अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जरांगे यांच्यासोबतच्या भेटीनंतर दिली. मनोज जरांगे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असंही चव्हाण यावेळी म्हणाले.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. एरव्ही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात. मराठा समाजाला आरक्षण मिळू न देण्यात देवेंद्र फडणवीस यांचाच हात आहे. तेच मराठा समाजाला ओबीसी प्रर्वगातून आरक्षण मिळू देत नाही, असा आरोप त्यांनी नुकताच केला होता. आता जरांगेच्या आरोपानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केलेत. काँग्रेसचं सरकार असतांना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं. त्यानंतर भाजपचं सरकार आलं तेव्हा भाजप सरकारला आरक्षण टिकवता आलं नाही असा आरोप चव्हाण यांनी केला.

आम्ही जुलै 2014 साली अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिलं होत, आमचं सरकार गेलं आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आणि त्यांनी मराठा समाजाचे आरक्षण टिकवलं नाही. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर मराठा आरक्षण लढ्याला आमच्या आघाडीच्या सरकारने पहिल्यांदा वाचा फोडली असं देखील चव्हाण म्हणालेत. आमची मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी आहे, आम्ही आमची भूमिका मांडली आहे आता सरकार म्हणून तुम्ही निर्णय घ्या असं चव्हाण राज्य सरकारला उद्देशून म्हणालेत.

चर्चा नका करू, मागणी मान्य करा असं म्हणत तुम्ही जरांगे यांना काय वाशी ला जे आश्वासन दिलं हे आम्हाला सांगितलं नाही. तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्याने जरांगे यांना पुन्हा उपोषणाला बसावे लागले अशी टीका देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर केलीय.

भेटीला आलं महत्त्व

लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी महायुतीविरोधात उघड भूमिका घेतली होती. त्याचा परिणाम म्हणून अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवाराचा पराभवदेखील झाला. जरांगे पाटील यांच्या या आवाहनाचा मराठवाड्यात मोठा परिणाम दिसला होता. मराठवाड्यातील आठ जागांपैकी सात जागांवर महायुतीला पराभव आला. विरोधकांच्या महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं.

मात्र आता जरांगे यांनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याची घोषणा केल्याने महायुतीसह महाविकास आघाडीच्या गोटातही अस्वस्थता आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि जरांगे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi : पंतप्रधान मोदींची विरोधकांवर कठोर शब्दांत टीका; पाहा Video

Marathi News Live Updates : सांगलीमध्ये ४० ते ५० जणांना भगरीच्या तांदळातून विषबाधा

Rekha: मी प्रेमाला नाही तर 'बिग बी'ला घाबरते, अभिनेत्री रेखाचा मोठा खुलासा; पाहा VIDEO

Irani Cup 2024: मुंबई'अजिंक्य'! २७ वर्षांची प्रतिक्षा संपवत कोरलं इराणी ट्रॉफीवर नाव

Rahul Gandhi : संविधानात शिवरायांची विचारधारा! राहुल गांधींनी कोल्हापुरातून महाराष्ट्राला केलं मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT