Manoj Jarange-Patil: विधानसभेचा प्लान फिस्कटला? मनोज जरांगेंचं ठरलं मग कुठं बिनसलं?

Assembly Election: विधानसभा निवडणुका लांबणीवर पडणार असल्याची चर्चा सुरू असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आपली रणनीती बदलल्याचं सांगितलं जात आहे.
Manoj Jarange-Patil:  विधानसभेचा प्लान फिस्कटला? मनोज जरांगेंचं ठरलं मग कुठं बिनसलं?
Manoj Jarange PatilSaam Tv
Published On

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा लढवण्याबाबतचा 29 ऑगस्टला होणारा निर्णय आता पुढे ढकललाय. विधानसभेच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे जरांगेंनी आपली रणनीती बदलल्याचं बोललं जातंय. मात्र जरागेंनी नेमकं कशामुळे घोषणा लांबणीवर टाकली? नेमकं काही बिनसलं की जरांगेंची यामागे गुप्त रणनीती आहे, यावरचा हा रिपोर्ट.

सरकारने आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणूक लढवणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वी करणारे मनोज जरांगेंनी अचानक आपली रणनीती बदललीय. विधानसभेत 288 पाडायचे की नाही यावर 29 ऑगस्टला बैठकीत मनोज जरांगे मोठी घोषणा करणार होते..मात्र सरकारनं निवडणूका लांबवल्यामुळे आपल्याला 29 ऑगस्टची बैठक पुढं ढकलावी लागली असं म्हणत जरांगेंनी सरकारवर खापर फोडलंय.

महाराष्ट्रातील पाऊस आणि सणांमुळे निवडणुका दिवाळीनंतर घेणार असल्याचं निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी म्हटलं होतं. एकीकडे सरकारनं नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर केलीये. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावून डिसेंबरमध्ये निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळेच जरांगेंनी एक पाऊल मागे येत 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलली आहे.

त्यामुळे जेव्हा निवडणुकीची तारीख जाहीर होईल तेंव्हा बैठक घेऊ असं म्हणत जरांगेंनी आपला प्लान पुढे ढकललाय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होतेय. त्यामुळे निवडणुका कधीही झाल्या तरी जरांगेंचं आव्हान सरकार समोर असणार एवढं नक्की.

Manoj Jarange-Patil:  विधानसभेचा प्लान फिस्कटला? मनोज जरांगेंचं ठरलं मग कुठं बिनसलं?
Maharashtra Politics : हसन मुश्रीफ यांना दणका देण्यासाठी शरद पवारांचा मास्टर प्लान; कोल्हापुरात राष्ट्रवादीची मोठी खेळी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com