prithviraj chavan saam tv
महाराष्ट्र

Prithviraj Chavan News : मुख्यमंत्री करायचं अन् दुधातल्या माशी सारखं फेकून द्यायचं हे याेग्य नाही : पृथ्वीराज चव्हाण

आमचे आदानी बद्दलचे प्रश्न कायम आहेत, त्याची उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली पाहिजेत असे आमदार पृथ्वीराज चव्हाणांनी नमूद केले.

संभाजी थोरात

Prithviraj Chavan News : भाजपाला या दृष्टचक्रातून बाहेर पडायचे झाल्यास कुणाला तरी मुख्यमंत्री केलं पाहिजे. या मुख्यमंत्र्यांना ढकलून दिलं तरी काही फरक पडणार नाही, पण हे योग्य नाही. मुख्यमंत्री करायचं आणि दुधातल्या माशी सारख त्याला फेकून द्यायच हे योग्य नाही अशी टिप्पणी आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी केली. मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्या पदाचा मान राखला गेला पाहिजे असेही आमदार चव्हाण यांनी नमूद केले. (Breaking Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय आम्ही भाजपाबरोबर जाणार नाही. त्यामुळे वावड्या उठवायच्या चालल्या आहेत असे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या वाटेवर आहेत का या प्रश्नावर नमूद केले. ते म्हणाले कधी कॉग्रेस बद्दल कधी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल, माझ्याबद्दलही वावड्या उठवल्या गेल्या.

आता भाजपाला या दृष्टचक्रातून बाहेर पडायचे झाल्यास कुणाला तरी मुख्यमंत्री केलं पाहिजे. त्या मुख्यमंत्र्यांना ढकलून दिल तरी काही फरक पडणार नाही पण हे योग्य नाही मुख्यमंत्री करायचं दुधातल्या माशी सारख त्याला फेकून द्यायच योग्य नाही अशी टिप्पणी आमदार चव्हाण यांनी केली. महाराष्ट्राची ही अस्मिता आहे.

राहुल गांधी मानहानीचा खटल्यात त्यांचे अपील सत्र न्यायालयाने मान्य केले नाही. त्यामुळे यापुर्वीची जी शिक्षा जी आहे तीच राहणार आहे असे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. दरम्यान राहुल गांधी यांची लीगल टीम त्यावर काम करत आहे असेही आमदार चव्हाण यांनी नमूद केले.

कमिशनर कायद्याखाली चाैकशी व्हावी

खारघर प्रकरणावर वेळ कोणी ठरवली, पुरस्कार ज्यांना दिला जाणार होता त्यांनी वेळ ठरल्याचे सरकार कडून सांगण्यात आले आहे. सरकारच्या कार्यक्रमाची वेळ सरकारच ठरवते. कुठल्यातरी राजकीय नेत्यांना दाखविण्यासाठी केली पण त्यातील एकही माणूसु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासाठी आलेले नव्हते. ते आप्पा साहेबांसाठी आले होते. मंडप का टाकला गेला नाही असा सवाल करीत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कमिशनर कायद्याखाली या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

पवार- अदानी भेट

ज्येष्ठ नेते शरद पवार गौतम अदानी यांच्या भेटी बाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कुणी कुणाला भेटावं याबाबत मी बोलणं योग्य नाही. आमचे आदानी बद्दलचे प्रश्न कायम आहेत, त्याची उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली पाहिजेत.

कंपन्या विकून पॆसे आणले आहेत असे आदानी सांगतो मग तू बे नामी कंपन्याच्या माध्यमातून मॉरिशसमध्ये का पैसे गुंतवले भारतात का गुंतवले नाही असा सवाल आमदार चव्हाण यांनी केला आहे.

आमदार चव्हाण म्हणाले आदानी - शरद पवार यांचे अगोदरपासून संबंध आहेत. त्यामुळे ते भेटले असतील मात्र कॉग्रेसची आदानीबाबतीत भूमिका कायम आहे. लोक अडचणीत आल्यानंतर वाचण्यासाठी प्रयत्न करतात तशी आदानी धडपड करत असेल त्यासाठी यांनी भेट घेतली असावी असेही आमदार चव्हाण यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT