Navi Mumbai Airport  google
महाराष्ट्र

New Mumbai Airport : मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांच्यातील अंतर किती? याचा फायदा नेमका कोणाला? वाचा

DB Patil Airport: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन केले. डी.बी. पाटील विमानतळामुळे नवी मुंबई प्रवाशांना सोयीस्कर प्रवास, कमी वेळेत पोहोच, आणि भविष्यात दरवर्षी ९ कोटी प्रवासी सेवा मिळेल.

Sakshi Sunil Jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन पार पाडले. नवी मुंबईचे हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल विमानतळानंतर मुंबईतले दुसरे विमानतळ आहे. हे विमानतळ दि.बा.पाटील नवी मुंबई या नावाने ओळखले जाणार आहे. या उपक्रमामुळे नवी मुंबईतील प्रवाशांना कमी वेळेत विमानाचा प्रवास करता येईल. तसेच विमानतळावर पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा कालावधी सुद्धा कमी होणार आहे. पुढे आपण मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर आणि कोणत्या स्थानकापासून कोणते विमानतळ जवळ असेल याबद्दल जाणून घेणार आहोत.

मुंबई आणि नवी मुंबई, ही दोन वेगवेगळी क्षेत्रे आहेत. मुंबई हा महाराष्ट्रातील जुने आणि प्राचीन शहर आहे, तर नवी मुंबई नियोजनानुसार नंतर उभारले गेलेले आधुनिक शहर आहे. त्यामुळे तुमच्यासाठी कोणता एयरपोर्ट जवळ असेल हे तुमच्या लोकेशनवर अवलंबून आहे.

जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल, तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ आहे. तर नवी मुंबई परिसरात राहणाऱ्यांसाठी लोकनेते डी. बी. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जास्त जवळ आहे.

मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांच्यातील अंतर सुमारे ३७ ते ३८ किलोमीटर आहे. मुंबई विमानतळापासून नवी मुंबई विमानतळापर्यंत जाण्यास दोन मुख्य मार्ग आहेत. पहिला मार्ग सांताक्रूझ ईस्ट आणि कुर्ला वेस्ट मार्गे जातो, तर दुसरा मार्ग बांद्रा ईस्ट, कला नगर, बीकेसी, चूना भट्टी आणि चेंबुर मार्गे जातो.

नवी मुंबई विमानतळाचा कोड 'NMI' असा ठरवला गेला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या विमानतळावर दरवर्षी २ कोटी प्रवाशांची आणि ५ लाख टन कार्गोची व्यवस्था केली जाणार आहे. पुढे विमानतळ तयार झाल्यावर या विमानतळावर दरवर्षी ९ कोटी प्रवासी आणि ३२ लाख टन कार्गो असा प्रवास होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित पवार यांच्या भेटीला

Face care: डाग आणि पिग्मेंटेशन कमी करुन ग्लोईंग चेहरा हवाय; मग रात्री झोपताना घरी तयार केलेलं 'हे' होममेड सीरम नक्की लावा

Shukra Asta 2025: धन दाता शुक्र होणार अखेर अस्त; या राशींच्या आयुष्यात येणार अडचणी

Maharashtra Politics: अजित पवारांनी मोठा डाव टाकला; एकाच दिवशी भाजप आणि उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का

Mumbai Travel : 2025 ला निरोप अन् नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत, मुंबईकरांनो न्यू इयरला 'या' ठिकाणी नक्की जा

SCROLL FOR NEXT