Mumbai Gold मेट्रो लाईन: मुंबईहून ४० मिनिटात गाठता येणार नवी मुंबई विमानतळ; जाणून घ्या ट्रेनचा मार्ग, किती असतील थांबे

Mumbai Gold Metro Line 8: मुंबई गोल्ड मेट्रो ही एक नवी मेट्रो लाईन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणार आहे. या मेट्रो लाईनद्वारे प्रवासी केवळ ४० मिनिटांत नवी मुंबई विमानतळ गाठू शकणार आहेत.
Mumbai Gold Metro Line 8
Mumbai Gold Metro Line 8 — soon connecting CSMIA to Navi Mumbai International Airport in just 40 minutes.saam tv
Published On
Summary
  • मुंबईत गोल्ड मेट्रो लाईन ८ द्वारे दोन विमानतळ जोडले जाणार आहेत.

  • या मेट्रोमुळे मुंबईहून नवी मुंबई विमानतळ फक्त ४० मिनिटांत गाठता येईल.

  • राज्य सरकारकडे सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात आलाय.

मुंबईत गोल्ड मेट्रो उभारली जाणार आहे. ही मेट्रो लाईन शहरातील सर्वात मोठी दोन विमानतळं एकमेकांना जोडली जाणार आहेत. मुंबई मेट्रो लाईन ८ सविस्तर प्रकल्प अहवालराज्य सरकारकडे सादर करण्यात आलाय. एकदा हा प्रकल्प मंजूर झाला तर मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांदरम्यानचा प्रवास जलद होणार आहे.

वाहतूक कोंडीमुळे वेळेत मुंबई विमानतळ गाठणं शक्य होत नाही. विमानतळावर जाण्यासाठी प्रवाशांना विमानाच्या वेळेआधीच घरातून निघावं लागतं. पण तरीही अनेकांची प्लाइट चूकत असते. त्यामुळे हे मेट्रो लाईन झाली तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सविस्तर कृती आराखडा सादर करण्यात आलाय. हा प्रकल्प छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा जोडला जाणार आहे. यामुळे शहरातील कुठूनही विमानतळावर पोहोचणे सोपे होणार आहे.

दोन्ही विमानतळांना जोडणारी मेट्रो लाईन ८चा डीपीआरच्या मंजुरीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडे सादर करण्यात आलाय. याच महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्येच मंत्रिमंडळ याला मंजुरी देईल असं म्हटलं जात आहे. मंत्रिमंडळानं मंजुरी आली तर सार्वजनिक गुंतवणूक मंडळाकडे त्यांच्या मंजुरीसाठी पाठवलं जाणार आहे.

Mumbai Gold Metro Line 8
ठाणेकरांसाठी गुड न्यूज! डिसेंबरमध्ये मेट्रोचे २ नवे मार्ग सुरू होणार, सरनाईकांनी दिली डेडलाईन, वाचा सविस्तर

मेट्रोची ही गोल्ड मेट्रो लाईन ३४.८९ किमी अंतराची असेल. तर यात २० स्टेशन असतील. त्यातील १४ एलिव्हेटेड आणि ६ स्टेशन भूमिगत असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अवघ्या ४० मिनिटात दोन्ही विमानतळाचं अंतर कापता येणार आहे. सध्या रस्त्याद्वारे जायचे असेल या प्रवासाला दीड तास लागतो. या गोल्ड मेट्रो लाईनमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Mumbai Gold Metro Line 8
Bullet Train: बुलेट ट्रेन लवकरच धावणार; मुंबई-अहमदबाद प्रवासाचे २ तास वाचणार, जाणून घ्या ट्रेनचा ताशी स्पीड अन् थांबे?

नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये

विमानतळ उभारणीस एकूण खर्च १ लाख कोटी लागणार आहे. ११६० हेक्टरवर विमानतळ उभारले जाणार आहे. एकूण चार टप्यात विमानतळ उभारलं जाणार आहे. या विमानतळावर दोन रनवे असतील. दोन रनवेसाठी स्वतंत्र टॅक्सीवे तयार केले जाणार आहेत. नवी मुंबई विमानतळ ते मुंबई विमानतळ मेट्रो सेवेने जोडणार आहे. मुंबई , ठाणे , नवी मुंबई , कल्याण डोंबिवली, कोस्टल रोडने विमानतळाशी जोडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com