Navi Mumbai Airport News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केल्या काही वर्षांपासून जोर धरत आहे. सरकारकडून दि बा पाटील यांचे नाव देण्याबाबत आश्वासन देण्यात आले. पण आज उद्घाटन होत असलेल्या निमंत्रण पत्रिकेवर मात्र त्यांचा नावाचा उल्लेख नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील अनेकजण नाराज असल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी काहीजण आंदोलनही करू शकतात. Why is D B Patil’s name missing from Navi Mumbai Airport invitation?
नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देणार असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र उद्घाटन आज होत आहे, तरी देखील निमंत्रण पत्रिकेवर विमानतळाचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असाच उल्लेख कऱण्यात आला आहे. दिबा पाटील यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी अनेक भूमिपुत्रांनी आंदोलन केले होते. आजही आंदोल होण्याची शक्यता नाहीच.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.