pregnancy test racket busted in bhokardan near sambhajinagar Saam Digital
महाराष्ट्र

संभाजीनगर : गर्भपात रॅकेटचा केंद्रबिंदू भोकरदन; डाॅक्टरांसह औषध व्यावसायिक शहरातून गायब

Chhatrapati Sambhajinagar Latest Marathi News : डॉ. सतीश सोनवणे याच्यावर बीड (2), जालना (1) आणि वाळूज (1) येथे एकुण 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत. पाेलिस अधिक तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

छत्रपती संभाजीनगर, वाळूज, सिल्लोड आणि त्यानंतर गर्भपात रॅकेटचे धागेदोरे आता थेट भोकरदन शहरापर्यंत पोहोचले आहेत. गर्भपात तपासा प्रकरणी संभाजीनगरचे एक पथक भोकरदन शहरात दाखल झाले. (Maharashtra News)

हे पथक भोकरदन शहरात दाखल होताच तेथील 2 डॉक्टर व काही मेडिकल व्यावसायिकांनी भोकरदन शहरातून पळ काढला आहे. या पथकाने दोन्ही डॉक्टरांच्या पत्नीला पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.

या नाेटीसमध्ये पाेलिसांनी डाॅक्टरांना तात्काळ हजर राहण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. दरम्यान या सर्व गर्भपात प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाळूज गर्भपात प्रकरणात कारागृहात असलेला डॉक्टर सतीश सोनवणे असल्याची माहिती आतापर्यंत झालेल्या तपासातून स्पष्ट झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्याशिवाय त्याच्यावर बीड (2), जालना (1) आणि वाळूज (1) येथे एकुण 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामधील धक्कादायक माहिती अशी की डॉ. सतीश सोनवणे यानेच सर्वांना गर्भलिंग निदान कसे करायचे हे शिकवले असल्याची माहिती तपासाअंती समोर आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT