Pravin Gaikwad Attacked in Akkalkot Saam Tv News
महाराष्ट्र

Pravin Gaikwad: 'शरद पवारांसाठी मी नातवासारखा' हल्ल्यानंतर प्रविण गायकवाडांना फोन, नेमकं काय बोलणं झालं?

Pravin Gaikwad Attacked in Akkalkot: अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली. या भ्याड हल्ल्याचा राजकीय नेत्यांकडून तीव्र निषेध करण्यात आला असून चौकशीची मागणी वाढली आहे.

Bhagyashree Kamble

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोट येथे शिवधर्म कार्यकर्त्यांकडून हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात त्यांच्यावर काळी शाई ओतून तोंड काळं करण्यात आलं. या हल्ल्याचा व्हिडिओही काही क्षणात व्हायरल झाला. हे प्रकरण समोर येताच सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. विरोधकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रवीण गायकवाड यांना फोन केला. तसेच विचारपूस केली. प्रवीण गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रवीण गायकवाड यांनी हल्ल्यानंतर नेमके कुणाचे कॉल आले, याबाबत माहिती दिली. 'या हल्ल्यानंतर मला अनेकांचे फोन आले होते. सत्ताधाऱ्यांकडून मला फोन येणं अपेक्षित नव्हतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा मला फोन आला. साहेबांसोबत मी अनेक वर्षे जोडलो आहे. त्यांनी माझी चौकशी केली. नातू, मुलगा म्हणून त्यांनी माझी विचारपूस केली. मला त्यांनी काळजी घे, असंही सांगितलं', असं गायकवाड म्हणाले.

तसेच, 'सुप्रिया सुळे, रोहित पवार, रोहित पाटील, विश्वजित कदम, सतेज पाटील, पुरूषोत्तम खेडेकर, सदाभाऊ खोत, माधव जनकर, रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही फोन करून माझी विचारपूस केली', अशी माहिती प्रविण गायकवाड यांनी दिली.

'अक्कलकोट पोलिसांनी अद्याप उपस्थित हल्लेखोरांना अटक केलेली नाही. आतापर्यंत फक्त दीपक काटेला ताब्यात घेतलंय. खरंतर पोलीस ठाण्यात फोन करून दीपक काटेला त्रास देऊ नका, सुरक्षा द्या, असं सांगण्यात आलं. या हल्ल्यानंतर माझ्या जीवाला धोका निर्माण झालाय. पोलिसांनी काटेवर ३०७ चे कलम लावायला हवे. यावेळी झालेल्या झटापटीत अनेक कार्यकर्त्यांचे महागडे ऐवज लंपास झाले. सोन्याचे दागिने लंपास केले. आमच्या वाहनांचे नुकसान केलं. पोलिसांनी गुन्हे दाखल करायला हवे होते', असंही गायकवाड म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Ahmedabad Highway : वाहतूक कोंडीने घेतला चिमुरड्याचा जीव; ट्रॅफिकमध्ये रुग्णवाहिका अडकल्याने घडली दुर्दैवी घटना | VIDEO

Maharashtra Live News Update: वसईच्या गिरीराज कॉम्प्लेक्समधील कंपनीला भीषण आग

Nanded : व्हिडीओ करत दिला इशारा, नुकसानग्रस्त शेतकऱ्याची नदीत उडी; पुराच्या पाण्यात उडी घेत गावकऱ्यांनी वाचविला जीव

ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया|VIDEO

कोणत्या भाजीच्या फोडणीमध्ये मिरचीच्या पेस्टचा वापर करू नये?

SCROLL FOR NEXT