औरंगाबाद : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपवर सडकून टीका केली होती. घोडेबाजारातील घोड्यांमुळे महाविकास आघाडी सरकारवर (mva government) कोणताही परिणाम होत नाही, असा घणाघात राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे केला होता. राऊतांच्या या विधानाचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin darekar) यांनी समाचार घेतला आहे. ओरंगाबाद मध्ये माध्यमांशी बोलताना दरेकरांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी काल शुक्रवारी विधानभवनात २८५ आमदारांनी मतदान केलं. त्यानंतर काल पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. मात्र भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारनाट्यामुळं निकालाबाबत रात्रीस खेळ सुरु होता. मात्र, पहाटेच्या वेळी राज्यसभा निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला. शिवसेनेचे संजय राऊत,राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे यांचा राज्यसभेच्या निवडणुकीत विजय झाला. त्यानंतर राजकीय वर्तुळातून नेतेमंडळींकडून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली आहे. राऊत खालच्या पातळीवर टीका करतात. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे. आम्हला पाहायचंय ते हिंदुत्व कसं करतात, हिंदुत्वापेक्षा शिवसेनेला सत्ता प्यारी झाली आहे. ते मतांसाठी लाचारी करतात, असा शब्दात दरेकर यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे.
संजय राठोड यांना मंत्रिमंडळात आणण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवार साहेब धक्के बसले तरी जाणवू देत नाहीत, असंही दरेकर म्हणाले. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, पंकजा ताई नाराज नाहीत, कुणी हल्ला केला माहीत नाही, पण पंकजा ताई पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत. विधान परिषदेच्या सहाच्या सहा जागा आम्ही जिंकू, असा विश्वासही दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.