प्रतीक्षा संपली! मुंबईत मान्सून बरसला; राज्यात 'या' भागांसाठी Yellow Alert

दिल्लीत उष्णतेच्या लाटेमुळे लोकांची अवस्था बिकट असली तरी मुंबईत मात्र हवामान बदलत आहे. मुंबईत मान्सून दाखल झाल्यामुळे तेथे मुसळधार पाऊस पडत आहे.
Mumbai Rain
Mumbai RainSaam Tv
Published On

गोव्यानंतर (Goa) आता नैऋत्य मोसमी पावसाने मुंबईतही (Mumbai) दार ठोठावले आहे, अशी भारतीय हवामान विभागाने (IMD) ही माहिती दिली आहे. तर यामुळे उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेपासून किरकोळ दिलासाही दिसत आहे. आयएमडीनुसार, पुढील आठवड्यात कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने सांगितल्यानुसार, गोवा आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra) दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख 7 जून होती. पुण्यात 11 जूनपर्यंत आणि मुंबईत 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल असे सांगण्यात आले होते. येत्या 3-4 दिवसांत मध्य अरबी समुद्राचा काही भाग, गोवा आणि कोकणालगतच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात मान्सूनचा (Monsoon) वेग अचानक मंदावला होता. त्यामुळे योग्य वेळी मान्सूनचे आगमन उशिरा होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र आता मान्सूनने योग्य वेग घेतला आहे, असे सांगण्यात आले आहे.

मुंबई आणि आसपासच्या परिसरात मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिला. याशिवाय पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, सांगली जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्र व्यापेल. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ठाणे, पुणे आणि मुंबईलगतच्या इतर भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे .

हवामान खात्याने कोकण, मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट जारी;

हवामान खात्याने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोकण विभागातील नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, धुळे येथे यल्लो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. याशिवाय जालना, बीड, परभणी, औरंगाबाद, नांदेड आणि विदर्भातील मराठवाडा विभाग, बुलढाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या भागांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच पुढील दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांतील नागरिकांना पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडण्यास सांगण्यात आले आहे.

Mumbai Rain
'अब्दुल सत्तारांनी राज्यसभा निवडणुकीत खूप मदत केली, विधानपरिषद निवडणुकीतही मदत करतील'

मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपली;

साधारणपणे 10 जूनपर्यंत मान्सून मुंबईत पोहोचतो. पुढील आठवड्यात मुंबईत सक्रिय होण्याचा दावा स्कायमेटने केला आहे. येत्या दोन दिवसांत संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र आणि त्यानंतरच्या दोन दिवसांत राज्यभर पावसाच्या सरी कोसळतील, असे हवामान खात्याने सांगितले आहे. म्हणजेच येत्या तीन ते चार दिवसांत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com