छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. प्रशात कोरटकरला वैद्यकीय तपासणीनंतर आज कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयामध्ये दोन्ही बाजूने वकीलांनी युक्तीवाद केला. युक्तीवाद संपल्यानंतर न्यायालयाने प्रशांत कोरटकरला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. २८ मार्चपर्यंत कोरटकरची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.
महिनाभरापासून फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर कोरटकला कोल्हापूरमध्ये आणण्यात आले. न्यायालयाबाहेर शिवप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कोणताही अनुच्चित प्रकार घडू नये यासाठी कोरटकरला मागच्या गेटमधून कोर्टात नेण्यात आले.
असीम सरोदे इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या बाजूने कोर्टात युक्तीवाद करत होते. 'प्रशांत कोरटकरच्या आवाजाचा नमुना घ्यायचा आहे. कोर्टाला तशी ऑर्डर करावी लागते. आरोपीला ७ दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी असीम सरोदे यांनी केली. आरोपीने छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. जिजाऊंवर कोरटकर यांनी शिंतोडे उडवले.', असा युक्तीवाद असीम सरोदे यांनी केला.
तसंच, 'आरोपी एक महिना कुठे होता? तो कुट फिरत होता? त्याला मदत कोण करत होत? हे शोधायचं आहे. कोणत्या गाडीने तो ३५० किलो मीटरपर्यंत गेला? त्याला गाडी कोणी दिली? याचा तपास करायचा आहे. त्याला नागपूरमधून मदत झाली आहे. तपास अधिकारी यांना नागपूरलामध्ये जाऊन तपास करायचा आहे.', असे असीम सरोदे यांनी न्यायालयात सांगितले.
सरकारी वकिलांनी न्यायालयात असा युक्तीवाद केला की, 'पोलिस रिमांड मिळावी. आज सकाळी ८ वाजता कोरटकरला अटक करण्यात आली. मोबाईल जमा करण्यासाठी हजर राहावं, असं हायकोर्टाने त्याला सांगितलं होते पण ते हजर राहिले नाहीत. कोरटकर यांनी मोबाईलमध्ये छेडछाड केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाला आहे. जास्तीत जास्त कोठडीची गरज आहे. आरोपीने जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे समजात तेढ निर्माण होईल.'
तसंच, 'आरोपीचा मोबाईल नागपूर सायबर सेलकडे जमा करायला लावला होता. तो त्याने नंतर जमा केला आहे. त्यात त्याने छेडछाड केली आहे. आरोपीला ३ वर्षे शिक्षा असली तरी हा गुन्हा नॉन बेलेबल आहे. पोलिसांना कोरटकरची कस्टडी मिळावी. डेटा का डिलीट केला याचा तपास करायचा आहे. त्याने रात्री कॉल केला तेव्हा त्याच्याबरोबर कोण होतं हे शोधायचे आहे. गुन्हा दाखल होत आहे असं समजलं तेव्हा आरोपीने एक अर्ज नागपूरमध्ये दाखल केला होता. त्याने आवाज मोर्ब केला आहे असा अर्ज केला होता.', असे सरकारी वकिलाने न्यायालयात सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.