Buldhana News : 24 तास उलटूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान डिक्कर यांचा प्रशासन शाेध घेत असतानाच त्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल हाेऊ लागला आहे. यामध्ये डिक्कर यांनी 48 तासांत नुकसानग्रस्तांना मदत करा अन्यथा अज्ञात ठिकाणीआत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. (Maharashtra News)
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या मागणीसाठी 'स्वाभिमानी' चे कार्यकर्ते डिक्कर यांच्यासह अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत. या आंदाेलनाचा आज सहावा दिवस आहे. (Swabhimani Shetkari Sanghatana Latest Marathi News)
दरम्यान आंदाेलनस्थळावरुन डिक्कर हे गुरुवारी गायब झाले. त्यामुळे प्रशासनावर त्यांना शाेधण्याची वेळ आली. गेल्या 24 तासापासून उपोषण मंडपातून बेपत्ता असलेल्या डिक्कर यांनी एका व्हिडिओ संदेशच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची तात्काळ मदत करावी अन्यथा आगामी काळात ते अज्ञात ठिकाणी आत्मदहन करतील असा इशारा दिला आहे.
प्रशांत डिक्कर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा व त्यांना शोधून आणण्याच्या मागणीसाठी आज (शुक्रवार) मोठ्या प्रमाणात शेतकरी व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जळगाव जामोद येथे साखळी उपोषण आयोजित केल आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.