Nitesh Rane News : सिंधुदुर्गच्या इतिहासात कधी नव्हे ते अशी निंदनीय घटना घडली : नितेश राणे

Kankavali : या घटनेच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी समाज माध्यमात केल्या जाणा-या पाेस्टवर लक्ष ठेवण्यास प्रारंभ केला आहे.
nitesh rane, social media
nitesh rane, social mediasaam tv

- विनायक वंजारे

Sindhudurg News : समाज माध्यमातून देव देवतांची बदनामी आणि पाकिस्तानचे गाेडवे गाणा-या युवतीचा तातडीने शाेध घ्यावा. तिची कसून चाैकशी करुन कठाेर कारवाई कारवाई करावी अशी मागणी आमदार नितेश राणे (nitesh rane latest marathi news) यांनी कणकवली पाेलिसांकडे केली आहे. (Maharashtra News)

nitesh rane, social media
Pankaja Munde At Mahurgad : भाऊला मी सोबत घेऊन आले आहे... आता रेणूका माताच मार्ग दाखवेल : पंकजा मुंडे

देशात पाकिस्तान जिंदाबादचे नारे देण्यावरून वातावरण तापलेले असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वामी समर्थांच्या फोटोवर समाज माध्यमातून टिप्पणी केल्याने व पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारे स्टेटस ठेवल्याने खळबळ माजली आहे. मूळ कर्नाटक येथील रहिवासी असलेल्या मात्र शिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात राहणाऱ्या कॉलेजच्या युवतीने हा प्रकार केला असे पाेलिसांच्या तपासात पुढे येत आहे.

nitesh rane, social media
Sachin Tendulkar ने नाेटीसीचे उत्तर न दिल्यास..., Bacchu Kadu यांचा प्लॅन तयार (पाहा व्हिडिओ)

भाजपा आमदार नितेश राणे व कार्यकर्त्यांनी कणकवली पोलिस अधिक्षकांची (Kankavali Police) भेट घेत गुन्हेगाराला शिक्षा व्हावी अशी मागणी केली. आमदार नितेश राणे म्हणाले सिंधुदुर्गच्या इतिहासात कधी नव्हे ते अशी निंदनीय घटना घडली आहे.

पाकिस्तानचे गाेडवे गायिले जात असतील आणि हिंदु देव देवतांची समाज माध्यमातून टिंगल उडवली जात असेल तर देशभक्त कायदा हातात घेतील. त्यामुळे पाेलिसांनी संबंधितांवर कठाेर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com