Pankaja Munde At Mahurgad : भाऊला मी सोबत घेऊन आले आहे... आता रेणूका माताच मार्ग दाखवेल : पंकजा मुंडे

पंकजा मुंडे म्हणाल्या येत्या 4 तारखेपासून मी शिवशक्ती परिक्रमा यात्रेला सुरुवात करणार आहे.
Pankaja Munde, Mahurgad, Shivshakti Parikrima
Pankaja Munde, Mahurgad, Shivshakti Parikrimasaam tv
Published On

- संजय सूर्यवंशी

Nanded News : रेणुका माताच सर्व काही मार्ग दाखवेल अशी भावना भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde Latest Marathi News) यांनी आज (बुधवार) माहूर गड येथील रेणुका मातेचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बाेलताना व्यक्त केली. मुंडे यांचा आजपासून शिवशक्ती (shivshakti) दाैरा प्रारंभ झाला. त्यासाठी त्या नांदेड येथे आल्या हाेत्या. (Maharashtra News)

Pankaja Munde, Mahurgad, Shivshakti Parikrima
Teachers Day दिवशी महाराष्ट्रातील लाखाे शिक्षक जाणार सामूहिक रजेवर; जाणून घ्या नाराजीचे कारण

माहूरगड येथील नियोजित दौऱ्यावर जात असताना अर्धापूर, वारांगा फाटा, हातगाव येथे पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उस्फुर्त स्वागत केले. त्यानंतर नांदेड विमानतळावर पंकजा मुंडे यांच्या समवेत माजी मंत्री महादेव जानकार (mahadev jankar) हे हाेते. त्यानंतर मुंडे आणि जानकर हे माहुरकडे रवाना झाले.

Pankaja Munde, Mahurgad, Shivshakti Parikrima
Sachin Tendulkar ने नाेटीसीचे उत्तर न दिल्यास..., Bacchu Kadu यांचा प्लॅन तयार (पाहा व्हिडिओ)

माहूरगडावर मुंडे यांनी माता रेणुका देवीचे दर्शन घेतले. पूजाअर्चा झाल्यानंतर त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. पंकजा मुंडे म्हणाल्या येत्या 4 तारखेपासून मी शिवशक्ती परिक्रमा यात्रेला सुरुवात करणार आहे.

रेणुका माताच मला मार्ग दाखवेल

शिवशक्ती हे मुख्य आहे. सर्व ब्रह्मांडाचा आणि मी शिवशक्ती परिक्रमा करत आहे. श्रावण महिन्यांत सर्व शक्तीपिठं जी आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यांचे दर्शन आणि जेवढे ज्योतिर्लिंग आहेत त्यांचं दर्शन करायाचा हा माझा पण होता. याची सुरुवात आमचं कुलदैवत श्री रेणुका माता दर्शनाने केली आहे. आता मला रेणुका माताच सर्व काही मार्ग दाखवेल अशी भावना मुंडे यांनी व्यक्त केली.

Pankaja Munde, Mahurgad, Shivshakti Parikrima
Palghar Dapchari Dairy Project : दापचरी दुग्ध प्रकल्पातील 160 कुटुंबांवर संक्रांत, सरकारने बजावली नाेटीस

माहूर गडावर राखी पाेर्णिमा साजरी

आज बहीण भावचे नाते अधिक घट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन (pankaja munde raksha bandhan) सण. आज भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि माजी मंत्री महादेव जानकर हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. माहुर येथे श्री रेणुका मातेचे दोघांनी दर्शन घेतले. यावेळी पंकजा मुंडे यांनी माजी मंत्री महादेव जानकर यांना राखी बाधून रक्षा बंधन सण माहुर गडावर साजरा केला. यावेळी जानकर यांनी पंकजा मुंडे यांना ओवाळणी देखील दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com