prashant dikkar demands teachers for marod school sangrampur  Saam Digital
महाराष्ट्र

Buldhana News : शिक्षकांची तातडीने नेमणुक करा अन्यथा विद्यार्थ्यांसह मंत्रालय गाठू;प्रशांत डिक्करांचा इशारा

prashant dikkar demands teachers for marod school sangrampur: यामुळे छाेट्या विद्यार्थ्यांनी देखील आता आक्रमक भूमिका घेत शिक्षक द्या अन्यथा घरीच जाणार नाही असे त्यांचे पालक म्हणताहेत.

संजय जाधव

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका येथील मारोड गावाच्या शाळेत शिक्षकच विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ आक्रमक झालेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा घोळ लवकरात लवकर संपवा अन्यथा मंत्रालयावर माेर्चा काढणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भचे नेते प्रशांत डिक्कर यांनी प्रशासनास दिला आहे.

इयत्ता पहिली ते चाैथीच्या वर्गापर्यंत मारोड येथील डिजीटल शाळेत शिक्षकच नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. यामुळे छाेट्या विद्यार्थ्यांनी देखील आता आक्रमक भूमिका घेत शिक्षक द्या अन्यथा घरीच जाणार नाही असे त्यांचे पालक म्हणताहेत.

दरम्यान संग्रामपूर शिक्षण विभागात विद्यार्थ्यांसह स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचा बेमुदत ठिय्या आंदाेलन केले. मारोड शाळेला कायमस्वरूपी शिक्षकांची मागणी डिक्कर यांनी केली. तत्काळ शिक्षक न मिळाल्यास विद्यार्थ्यांना घेऊन मंत्रालयावर धडकणार असा इशारा देखील प्रशासनास प्रशांत डिक्कर यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhendi Facepack : नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी लावा भेंडीचा फेस पॅक

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

Bhakri Making Tips : भाकरी थापताना तुटते? टेन्शन घेऊ नका, फक्त 'या' सोप्या टिप्स वापरा

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट, 2100 नाहीतर 4500 मिळणार|VIDEO

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT