Saam Tv च्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे, 'त्या' 15 डमी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

shahada police charged 15 dummy students for attempting marathi typing exam: प्रभारी गटशिक्षण अधिकारी योगेश सावळे यांनी याबाबत शहादा पोलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली.
shahada police charged 15 dummy students for attempting marathi typing exam
shahada police charged 15 dummy students for attempting marathi typing examSaam Digital
Published On

- सागर निकवाडे

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील वसंतराव नाईक विद्यालयात मराठी टायपिंग परिक्षेस डमी म्हणून 15 विद्यार्थी बसल्याचा पर्दाफाश नुकताच साम टीव्हीने केला. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. तब्बल आठवड्यानंतर या प्रकरणी 15 विद्यार्थ्यांवर परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधित कायद्याअंतर्गत (कलम 426, 416, 419) गुन्हा नाेंदविला आहे.

शहादा येथील वसंतराव नाईक विद्यालयात 19 जूनला मराठी टायपिंगची परिक्षा झाली. या परिक्षा केंद्रावर होत असलेल्या गैरप्रकाराची गोपनीय माहिती परिक्षा परिषद पुणे यांचे मार्फत तहसिलदारांना मिळाली होती.

shahada police charged 15 dummy students for attempting marathi typing exam
माजी आमदाराकडं मागितली एक काेटींची खंडणी, 25 हजार घेताना एकास पकडले; दाेन महिलांवरही गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण

नायाब तहसिलदार शैलेश गवते यांनी परिक्षा केंद्रावर भेट दिली. या केंद्रावरील तपासणीत 25 विद्यार्थ्यापैकी 1 विद्यार्थी परीक्षेस गैरहजर हाेता. दरम्यान 24 पैकी 15 विद्यार्थी हे डमी असल्याचे आढळून आले होते.

याचे सविस्तर वृत्त साम टीव्हीने 22 जूनला प्रसारित केले. प्रभारी गटशिक्षण अधिकारी योगेश सावळे यांनी याबाबत शहादा पोलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली. त्यानूसार 15 डमी विद्यार्थ्यांवर परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधित कायद्याअंतर्गत तोतेगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

shahada police charged 15 dummy students for attempting marathi typing exam
जीव मुठीत धरुन छत्रपती संभाजीनगरमधील व्यापाऱ्यांना पळावे लागले, रात्री काय घडलं कराेडी टाेल नाक्यावर (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com