Kolhapur News : Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : प्रकाश आवाडे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार; समजूत काढण्यास मुख्यमंत्र्यांना यश

Prakash awade news : धैर्यशील माने यांच्या उमेदवारीमुळे ते नाराज होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रकाश आवाडे यांची समजूत काढण्यस यश आलं. यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांच्या मार्गातील अडचण दूर झाली आहे.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूर : भाजपला पाठिंबाला दिलेले कोल्हापुरातील इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी हतकंगणले लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली होती. मी महायुतीचाच उमेदवार आहे, असा दावा करत आवाडे यांनी मंगळवारी १६ एप्रिलला निवडणूक अर्ज दाखल करण्याची ठरवलं होतं. धैर्यशील माने यांच्या उमेदवारीमुळे ते नाराज होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रकाश आवाडे यांची समजूत काढण्यस यश आलं. यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांच्या मार्गातील अडचण दूर झाली आहे.

प्रकाश आवाडे यांनी कोल्हापुरातील हतकंगणले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आवाडे हे मंगळवारी अर्ज दाखल करणार होते. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आवाडे यांची भेट घेतली. त्यानंतर दोघांमध्ये उमेदवारीवरून चर्चा झाली.

या दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर प्रकाश आवाडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. प्रकाश आवाडे यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करत शिंदे गटाला दिलासा दिला आहे. प्रकाश आवाडे यांच्या भूमिकेमुळे शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रकाश आवाडे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली. त्यानंतर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत स्वत: प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. प्रकाश आवाडे यांचं बंड थंड करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यशस्वी झाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरातील दोन्ही लोकसभेच्या जागांवर लक्षकेंद्रीत केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी संध्याकाळी कोल्हापुरात दाखल झाले होते. त्यानंतरही ते रविवारी देखील काही तास कोल्हापुरात होते. या काळात त्यांनी प्रकाश आवाडे यांचं बंड हे थंड केलं. यामुळे धैर्यशील माने यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad News: रायगडावर फिरण्यासाठी गेला, ८०० फूट खोल दरीत मृतदेह आढळला; मुंबईच्या तरुणासोबत काय घडलं?

Bullet Train: अबब! 12 मजली इमारती इतका उंच अन् 480 मीटर लांब; बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर उभारला भव्य पूल, काय आहे पुलाची खासियत? वाचा

Maharashtra News Live Update: ठाण्यातील पुर्णेकर हत्या प्रकरणावरून आता आगरी समाज आक्रमक

Copper Utensils : धनतेरसपूर्वी तांबे-पितळाची भांडी घेताय? शुद्धता ओळखण्यासाठी या ट्रिक येतील कामी

Rice Water Benefits for Skin : चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावल्याने होतात ‘हे’ 5 चमत्कारिक फायदे; काळे डाग अन् सुरकुत्या होतील गायब

SCROLL FOR NEXT