Shrikant Shinde : हसायचं की रडायचं? पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले; श्रीकांत शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर

Lok Sabha Election : राऊतांचा मोदींवरील विश्वास वाढला आहे. पत्राचाळ आरोपी, जेलमध्ये जाऊन आलेत, तेच आता पत्र लिहीत आहेत, अशा शब्दांत श्रीकांत शिंदेंनी टीका केलीये.
Lok Sabha Election
Shrikant ShindeSaam TV

विकास काटे

हसायचं की रडायचं? पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले आहेत. त्यांनी पत्रात नेमकं काय लिहिलं ते मी वाचलं नाही, अशा शब्दांत खासदार श्रीकांत शिंदेंनी खासदार संजय राऊतांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे.

Lok Sabha Election
CM Eknath Shinde: अबकी बार 45 पार, पण आपण 48 पर्यंत जाऊ शकतो, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवर ५०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याबाबत संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. श्रीकांत शिंदेंचा बाळराजे असा उल्लेख करत, चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्र राज्यातदेखील सुरू आहे. त्याखेळाचे सूत्रधार आहेत मिंधेसरकारचे बाळराजे! सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत, असे आरोप संजय राऊतांनी केलेत.

या आरोपांवर प्रत्युत्तर देताना श्रीकांत शिंदेंनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र दिले, म्हणजे मोदींवरील त्यांचा विश्वास वाढला आहे. पत्राचाळ आरोपी, जेलमध्ये जाऊन आलेत, तेच आता पत्र लिहीत आहेत, अशा शब्दांत श्रीकांत शिंदेंनी टीका केलीये.

पुढे खिचडी घोटाळ्याचा उल्लेख करत राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सर्व पैसे खिचडी घोटाळा आरोपी कुटुंबीयांच्या खात्यात आले आहेत, असंही श्रीकांत शिंदे म्हणाले. तसेच आजवर तुम्ही कुणाला मदत केली आहे का?, असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे.

पत्रामध्ये लिहिलेला तपशील मोघम मोघम आहे. कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. तुम्हाला जर यावर प्रश्न असतील तर त्याची उत्तरे तुम्ही शोधून काढा. काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. चांगला डॉक्टर बघा, त्यासाठी देखील वैद्यकीय कक्ष मदत करायला तयार आहे. त्यांची ट्रीटमेंट सर्व खर्च त्या ठिकाणी वैद्यकीय कक्ष करेल, अशा शब्दातं श्रीकांत शिंदेंनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

Lok Sabha Election
CM Eknath Shinde आणि Shrikant Shinde यांना धमकी देणारा अटकेत | Marathi News #shorts

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com