Solapur News: सोलापुरात 'वंचित आघाडी'ला मोठा धक्का! जिल्हाध्यक्षांनी ठोकला पक्षाला रामराम

Vanchit Bahujan Aaghadi Solapur: सोलापूर आणि माढा लोकसभेचे उमेदवार आजचं आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अशातच जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Saam TV

सोलापूर, ता. १५ एप्रिल २०२४:

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. एकीकडे सोलापूर आणि माढा लोकसभेचे उमेदवार आजचं आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अशातच जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

जिल्हाध्यक्षांचा राजीनामा..

सोलापूर जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. श्री शैल गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे. उमेदवारीबाबत विचारात घेतले नसल्याचे खंत व्यक्त करत प्रकाश आंबेडकर यांनी राजीनामा देण्यास सांगितल्यामुळेच पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे श्रीशैल गायकवाड यांनी म्हटले आहे.

उमेदवारीवरुन नाराज..

"बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः राजीनामा द्यायला सांगितला. मी आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता आहे. पक्षादेश स्विकारुन मी राजीनामा दिला. काही लोकं आंबेडकरी चळवळ संपवायचं प्रयत्न करत आहे.यापुढे देखील मी आंबेडकर चळवळीच काम करणार आहे, असेही श्रीशैल गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Prakash Ambedkar
Loksabha Election: मनोज तिवारींविरोधात कन्हैया कुमार मैदानात! दिल्लीत काँग्रेसची मोठी खेळी; काय आहे रणनिती?

वंचितला धक्का..

"आंबेडकरी चळवळीतला मी एकमेव गद्दार नसणारा माणूस आहे त्यामुळे अशी वागणूक मिळत आहे. मी शेवटपर्यंत आंबेडकरी चळवळीत राहणार आहे. निळा झेंडा सोडणार नाही. वंचितचं नव्हे तर आता आंबेडकरी चळवळीच काम करणार आहे," असे म्हणत आपली आगामी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.

दरम्यान, एकीकडे वंचित आघाडीचे सोलापूर आणि माढा लोकसभेचे उमेदवार आजचं आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच जिल्हाध्यक्षाने राजीनामा दिल्याने वंचित आघाडीला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.

Prakash Ambedkar
Amol Kolhe : माझे काका नटसम्राट नव्हते; अमोल कोल्हेंचं आजित पवारांना सडेतोड प्रत्युत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com