Prakash Ambedkar Saam Digital
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : माझ्याविरोधात अकोल्यातून निवडणूक लढवावी; प्रकाश आंबेडकरांचं PM नरेंद्र मोदींना खुलं आव्हान

Lok Sabha Election 2024 : आम्ही महाविकास आघाडीत आहोत की नाही याबद्दल आम्हालाही संभ्रम आहे. जर एकट लढलो तर आमची लढत भाजपसोबत असल्याचं म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्याविरोधात अकोल्यातून निवडणूक लढावी, असं खुलं आव्हान दिलं आहे.

Sandeep Gawade

Prakash Ambedkar On PM Narendra Modi

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या प्रस्तावावर आणखी पेच निर्माण झाला असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्राकाश आंबेडकर यांनी आम्ही महाविकास आघाडीत आहोत की नाही याबद्दल आम्हालाही संभ्रम आहे. जर एकट लढलो तर आमची लढत भाजपसोबत असल्याचं म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्याविरोधात अकोल्यातून निवडणूक लढावी, असं खुलं आव्हान दिलं आहे.

ज्या मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद आहे. त्याची माहिती महाविकास आघाडीकडे दिली आहे. 15 जागा ओबीसी समजासाठी आणि 3 अल्पसंख्याकांसाठी राखीव ठेवाव्यात. माध्यमांमध्ये आमच्या मुद्द्यांना आमच्या अटी म्हणून सांगितलं गेलं, मात्र त्यात काही तथ्य नाही. आम्ही त्यांच्याकडे आमचं म्हणणं मांडलंय, त्यांनी निर्णय घ्यावा. कार्यकर्ते उत्साही असतात. आमच्या पक्षात भांडणं वाढू नये, डोकेदुखी वाढू नये म्हणून मविआच्या बैठकीला जावू नका असे म्हटलं होतं. मात्र 15 जागांवरचा तिढा सुटला तर पुढे निर्णय घेतला जाईल. मात्र एकट लढलो तर आमची लढत भाजपसोबत असेलं, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी सहभागी होईल की नाही याबाबत संभ्रम कायम आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्ध्याच्या जिल्हा कार्यकारिणीने तिथल्या उमेदवाराची शिफारस केली आहे, मात्र अद्याप पक्षानं निर्णय घेतलेला नाही. चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर 8 तारखेला अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल. मात्र मविआच्या पुढच्या बैठकीचं निमंत्रण नाही. 6 मार्चला शरद पवारांकडून भेटीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. त्या भेटीतही मविआसोबत नाही जुळलं तर सध्या काहीच सांगू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT