Maharashtra Loksabha Election 2024:  Saamtv
महाराष्ट्र

Kolhapur Loksabha: मोठी बातमी! 'वंचित आघाडी'चा शाहू महाराज छत्रपतींना पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

Maharashtra Loksabha Election 2024: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती यांना वंचितचा पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली आहे.

Gangappa Pujari

सूरज मासुरकर, मुंबई|ता. २३ मार्च २०२४

Prakash Ambedkar News:

एकीकडे महाविकास आघाडी आणि वंचितच्या युतीचा तिढा अद्दाप सुटलेला नाही. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती यांना वंचितचा पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली आहे. (Maharashtra Loksabha Election)

काय म्हणालेत प्रकाश आंबेडकर?

"आम्ही आदर्श भूमिका घेत असतो. त्यामुळे शाहू महाराजांचे विचार आणि त्यांचे कुटुंब हे चळवळीचे जवळचे कुटुंब आम्ही मानतो. म्हणून पक्षाच्या वतीने त्यांना आमचा पुर्णपणे पाठिंबा आहे. छत्रपती शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी जे प्रयत्न करायला लागतील. ते पक्षाच्या वतीने आम्ही करु. तसेच मागे ते घडलं ते पुन्हा घडू नये याची दक्षता घेऊ," असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

"ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवा पक्ष काढला आहे. त्यांनी त्यांची यादी आमच्याकडे सादर केली. त्यांना एवढंच सांगितलंय की आमचं घोंगडं तिकडं भिजतं ठेवलंय. त्यामुळे ते मिटल्याशिवाय आम्ही निर्णय घेऊ शकत नाही, असे म्हणत महाविकास आघाडीच्या युतीबाबतची चर्चा त्यांनाच विचारा," असेही ते प्रकाश आंबेडकर म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शाहू महाराजांनी मानले आभार..

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी आभार मानले आहेत. "वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला पाठिंबा जाहीर केल्याचे मला आत्ताच कळालं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांचे संबंध हे किती जिव्हाळ्याचे होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. हा दृष्टिकोन ठेवूनच त्यांनी मला हा पाठिंबा दिला असेल असं मला वाटतं," असे शाहू महाराज म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोगरी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

SCROLL FOR NEXT