Prakash Ambedkar on Mumbai Maratha March  Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या पाठीमागे ताकदीने उभे राहा; प्रकाश आंबेडकरांनी मराठ्यांना काय सल्ला दिला?

Prakash Ambedkar on Maratha Reservation: मुंबईतील मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा बांधवांना महत्वाचा सल्ला दिला आहे.

Satish Daud

Prakash Ambedkar on Mumbai Maratha March

मराठा समाजाला आरक्षण सरकारने आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याची घोषणा केली. त्यानुसार, २० जानेवारीपर्यंत मुंबईला पोहोचण्याची मराठा आंदोलकांकडून तयारी सुरू आहे. अशातच वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा बांधवांना महत्वाचा सल्ला दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या पाठीमागे गरीब मराठा समाजाने पूर्ण ताकदीने उभं राहिलं पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मराठा समाजासाठी जरांगेंसारखं गरीब मराठ्यांचं नेतृत्व उभे राहलं ही गर्वाची गोष्ट आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शुक्रवारी अकोला येथे जाहीर पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेतून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्याचबरोबर आंबडकरांनी मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांना महत्वाचा सल्ला देखील दिला आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामुळे श्रीमंत मराठा समाज हादरला आहे. त्यामुळे त्यांचं मुंबईतील आंदोलन दडपण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणला जात आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचे सरकारचे आकडे फसवे असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

राज्यातील गरीब मराठा समाजातील लोकांनी जरांगे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. मुंबईतील आंदोलनात गरीब मराठ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, असा सल्लाही आंबेडकर यांनी मराठा बांधवांना दिला. आगामी निवडणुकीमुळे सरकारचा हात दगडाखाली असल्याचं जरांगेंनी लक्षात घ्यावं, असंही आंबेडकर म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत कुणालाही पाठिंबा देण्याची भूमिका घेऊ नये, त्यांनी फक्त आपल्या समाजाचीच भूमिका जाहीर करावी, असंही आंबेडकर म्हणाले. सरकारकडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओबीसींना उचकवण्याचं काम सुरू आहे, असा आरोपही आंबेडकर यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT