Maratha Reservation : ...मग गुन्हे मागे घ्या म्हणता, मनोज जरांगे यांनी मुंबईला जाऊ नये; शंभुराज देसाईंची विनंती

Shambhuraj Desai On Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील मुंबईला येण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र यामुळे मुंबईत अडचण होईल. मिनिटावर चालणारी मुंबई यामुळे थांबू शकते, असं शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.
Shambhuraj Desai On Manoj Jarange
Shambhuraj Desai On Manoj JarangeSaam Tv
Published On

Manoj Jarange Patil :

मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांसह उद्या २० जानेवारीला अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या देशाने निघणार आहेत. राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत अंतिम तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे पाटील मुंबईत पायी येण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मात्र काही लोक वातावरण बिघडवू शकतात आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

Shambhuraj Desai On Manoj Jarange
PM Modi in Solapur : उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे... PM मोंदीच्या उपस्थितीत मंचावरील एका भाषणाने सर्वांच्या भुवया उंचावल्या, पाहा VIDEO

मनोज जरांगे पाटील मुंबईला येण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र यामुळे मुंबईत अडचण होईल. मिनिटावर चालणारी मुंबई यामुळे थांबू शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रोटोकॉल सोडून त्यांच्या आंदोलनाजवळ गेले. अनेक मंत्री देखील गेले. असं असताना देखील ते मुंबईत येणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे यांना विनंती करतो उद्या मुंबईला जाऊ नये. लाखो लोक आले तर लोकांची अडचण होऊ शकते. चार दोन लोक वातावण बिघडवू शकतात. त्यानंतर अंदोलन बिघडले तर कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यानंतर सरकारने कारवाई केली तर गुन्हे मागे घ्या म्हणता, असं शंभुराज देसाई यांनी म्हटलं.

Shambhuraj Desai On Manoj Jarange
PM Narendra Modi : १३ महिने ७ दौरे; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढत्या महाराष्ट्र दौऱ्यांचा अर्थ काय?

54 लाख कुणबी प्रमाणपत्र द्या, असं मनोज जरांगे म्हणत आहेत. मात्र वेळ लागलोत. पण जर गडबडीत दाखले दिले आणि काही चुकले तर अडचण होईल. त्यामुळे सरकार वेळकाढूपणा करत नाही. आरक्षण रद्द होऊ नये यासाठी काळजी घेत आहे, असंही शंभुराज देसाई यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com