Prakash Ambedkar And Narendra Modi  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : PM मोदींच्या मुंबई दौऱ्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, देशात हुकूमशाही...

देश हुकूमशाहीच्या दिशेने जात असल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

Ruchika Jadhav

तबरेज शेख

Prakash Ambedkar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १९ जानेवारी रोजी मुंबई दौरा पार पडला. यावेळी त्यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले यावर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. मोदींनी केलेल्या उद्घाटनाला त्यांनी सरपंचाच्या कामाशी तुलना केली असून देश हुकूमशाहीच्या दिशेने जात असल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. (Latest Prakash Ambedkar News)

पंतप्रधानांची खुर्ची आता ग्रामपंचायतीच्या लेवलला आणली

मुंबईमध्ये पंतप्रधानांनी येऊन मेट्रोचं उद्घाटन करणं आणि दोनदा करणं हे माझ्या अंदाजानं ग्रामपंचातीमधील जो सरपंच असतो तो जसं सारखं एक काम झालं की, दुसऱ्याच्या उद्घाटनाला देखील जातो तसं काहीसं झालं आहे. त्यामुळे पंतप्रधानांची खुर्ची आता ग्रामपंचायतीच्या लेवलला आणली याचं दु:ख आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

देशात हुकूमशाहीला सुरुवात झाली आहे

राजकीय पक्ष म्हणून आम्ही म्हणत आहोत की, हुकूमशाहीला सुरूवात झाली आहे. ही हुकूमशाही तुम्हाला वाटते का? हा प्रत्येक माणसाचा प्रश्न आहे. या अगोदर कार्यक्रम पत्रिकेत सत्ताधारींसोबत विरोधी पक्षाच्या नेत्यांचे देखील नाव असायचे. मात्र आता तसं दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक माणसाने ठरवावे की, ही हुकूमशाही आहे की नाही. मतदाराने आणि सामान्य माणसाने ही हुकूमशाही आहे का हे ठरवलं पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

रतन बनसोडे (उमेदवार) गेल्या सहा महिन्यांपासून मतदारांची नोंदणी करण्याचे काम करत आहे. पक्ष बाजूला ठेऊन व्यक्तिगत राजकारण सुरू आहे. याला आळा बसला पाहिजे. आम्ही आता स्पर्धेत आहोत. यात काही जण पैसेवाले आहे. २००५ साली काही जणांनी उत्साहाच्या भरात एकदा काँग्रेस आणि एकदा भाजपाला निवडून दिले. या दोघांनी जुनी पेन्शन योजना बंद केली, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Edited by - Ruchika Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BEL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; ९०,००० रुपये पगार; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

Women’s World Cup : ३ पराभवानंतरही संधी कायम, उपांत्य फेरीचं तिकिट कसं मिळणार? वाचा संपूर्ण गणित

ठाकरे गटाला दिवाळीत बंपर लॉटरी! भाजपमधील महिला नेता शिवसेनेच्या वाटेवर, लवकरच पक्षप्रवेश होणार

Ranjeet Kasle : झुकेगा नहीं.. बीडच्या रणजीत कासलेच्या मुसक्या आवळल्या, अटक करताच केली पुष्पाची स्टाईल

SCROLL FOR NEXT