Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येण्यासाठी सकारात्मक; राष्ट्रवादीच्या 'त्या' निर्णयाकडे लक्ष

महाविकास आघाडीत येण्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठं भाष्य केलं आहे.
Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar News Saam Tv
Published On

Prakash Ambedkar News : अॅड. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी लवकरच महाविकास आघाडीसोबत दिसण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांच्या बैठकाही सुरू आहेत. महाविकास आघाडीसोबत लवकरच वंचित बहुजन आघाडी दिसणार, असल्याचं भाष्य सुभाष देसाई यांनी काल केलं. त्यानंतर महाविकास आघाडीत येण्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठं भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

Prakash Ambedkar News
Ajit Pawar : 'देवेंद्र फडणवीसांना साडे चार वर्ष मुख्यमंत्री राहून...'; अजित पवारांचा अधिवेशनात गौफ्यस्फोट

वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा आज, नागपुरातील मॉरिस कॉलेज मोर्चा टी पॉईंटवर मोर्चा काढला. या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा सहभाग होता. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या सभेनंतर प्रकाश आंबेडकरांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या युतीबाबत मोठं भाष्य केलं.

अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Amebdakar) म्हणाले, 'शिवसेना ठाकरे गटाबरोबर आमची आघाडी जवळपास निश्चित आहे. मात्र, शिवसेनेचा असा प्रयत्न चालला आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतही ही आघाडी झाली पाहिजे'.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, ' अजित पवार यांनी सांगितले आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सध्या आपापसात बोलत आहेत. दोघांमध्ये काय चर्चा सुरू आहे हे कोणालाही माहित नाही. जेव्हा केव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निर्णय होईल. त्यानंतरच पुढचं पाऊल पडेल'.

Prakash Ambedkar News
Anil Deshmukh: अनिल देशमख यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; जामिनाचा मार्ग मोकळा, सीबीआयची याचिका फेटाळली

'आता आम्ही शिवसेनेसोबत युतीत राहू की महाविकास आघाडीचा भाग राहू हे त्यांना ठरवायचे आहे. शिवसेनेला निर्णय लवकरात लवकर करावा लागेल. कारण, महानगरपालिकेच्या निवडणुका अजून दोन-तीन महिन्यात होतील असं दिसत नाही, असे प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले. प्रकाश आंबेडकरांच्या या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेते काय प्रतिक्रिया देतील, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com