Maharashtra Politics Breaking: CM शिंदे- प्रकाश आंबेडकर एकत्र येणार का? दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर चर्चेला उधाण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात अडीच तास गुप्त बैठक झाल्याचं कळतं.
CM Eknath Shinde and Prakash Ambedkar/File
CM Eknath Shinde and Prakash Ambedkar/FileSAAM TV

Maharashtra Politics Breaking News : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून नवनवीन समीकरणे उदयास येत असतानाच, आता आणखी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात काल, बुधवारी अडीच तास गुप्त बैठक झाल्याचं कळतं. त्यामुळं राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज्याच्या राजकारणात आघाड्या आणि युतीची समिकरणे जुळवली जात आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्षासोबत युती करून एक पाऊल पुढे टाकलं आहे. तर दुसरीकडे, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. (Maharashtra Political News)

CM Eknath Shinde and Prakash Ambedkar/File
Navid Musharif : छापेमारीनंतर नावीद मुश्रीफ यांची आक्रमक भूमिका; म्हणाले, आमच्या केसालाही धक्का...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात काल अडीच तास बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या दोन्ही नेत्यांमध्येही बैठका सुरू आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे संकेत दिले होते. मात्र, आता आंबेडकर-शिंदे भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा नव्याने चर्चा झाली आहे.

CM Eknath Shinde and Prakash Ambedkar/File
Nitesh Rane : २०२४ मध्ये अमोल कोल्हेंना आपटून टाकू; नितेश राणेंचा घणाघात

यापूर्वीही एकनाथ शिंदे यांनी राजगृहावर जात प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. आता काल रात्री पुन्हा बंद दाराआड प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com