Prakash Ambedkar  SaaM TV
महाराष्ट्र

Sharad Pawar- Prakash Ambedkar : वंचितची महाविकास आघाडीत एन्ट्री होणार?; पवार-आंबेडकरांच्या भेटीत काय घडलं?

Political News: राज्याच्या राजकारणात लवकरच मोठे राजकीय भूकंप होणार असं वक्तव्य नुकतंच प्रकाश आंबेडकर यांनी केंल होतं.

साम टिव्ही ब्युरो

Political News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. वाय बी चव्हाण सेंटर येथे ही भेट झाली. (Latest Marathi News)

राज्याच्या राजकारणात लवकरच मोठे राजकीय भूकंप होणार असं वक्तव्य नुकतंच प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यानंतर आता शरद पवारांसोबत त्यांची भेट झाल्याने या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच या भेटीमागे काही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

वंचित कितव्या स्थानावर?

महाविकास आघाडीमध्ये वंचितची एन्ट्री झाल्यास त्यांचे स्थान कितवे असणार? वंचित महाविकास आघाडीमधील चौथा पक्ष असणार का? किंवा मग वंचित महाविकास आघाडीमध्ये आल्यावर देखील ठाकरे-वंचित असे स्थान असणार अशा काही शक्यता वर्तवल्या जात आहेत.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी याआधी अनेकवेळा शरद पवारांवर टीका केली आहे. त्यामुळे या भेटीमागे काय घडलं, कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. त्यामध्ये वंचितला महाविकास आघाडीमध्ये एन्ट्री मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanyachya Daliche Pani: १५ दिवस चण्याच्या डाळीचे पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात?

80s च्या ट्रेंडने सोशल मीडियावर क्रेझ; आमिर खानपासून कियारा आडवाणीपर्यंत सेलिब्रिटींचा भन्नाट रेट्रो लूक

Apple iPhone Duo: Apple चा पहिला फोल्डेबल iPhone Duo लॉन्च; 2TB स्टोरेजसह किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Maharashtra News Live Update: धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, माजी मंत्री तानाजी सावंत यांची शासनाकडे मागणी

Milk Cake Recipe: गोड आणि हेल्दी खाण्याची इच्छा होते? घरी बनवा मऊ आणि दाणेदार मिल्क केक; जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT