Bachchu Kadu News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: बच्चू कडूंना 'जोर का झटका', आमदार राजकुमार पटेल शिंदे गटाच्या वाटेवर?

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती|ता. ६ ऑक्टोबर

राज्याच्या विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असताना प्रहार संघटनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार राजकुमार पटेल हे प्रहार पक्ष सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत आता प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली असून प्रहारला कमकुवत करण्यासाठी भाजप- शिवसेनेची खेळी असल्याचा मोठा आरोप केला आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार राजकुमार पटेल हे प्रहार पक्ष सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत जाणाऱ्या जोरदार चर्चा रंगत असताना ही भाजप सेनेची खेळी आहे, बच्चू कडूला कसं कमी करता येईल हा प्रयत्न त्यांनी चालू केलेला आहे. त्याचा पहिला प्रयत्न राजकुमार पटेल यांना तिकीट देऊन प्रहार कमजोर करण्याचा प्रयत्न आहे पण ते होणार नाही, कोणताही पक्ष नेत्यावर अवलंबून नसतो तो कार्यकर्ते व जनतेवर अवलंबून असतो, एक गेले तर आम्ही दहा आमदार निर्माण करू, अशा शब्दात घणाघात केला आहे.

वीस वर्षात कोणत्याही मोठ्या पक्षाचा पाठिंबा न घेत आम्ही आव्हान पेलले, काही लोक निवडणुकीला घाबरतात पण आम्ही निवडणुकीला घाबरवतो. राजकुमार पटेल हे त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी शिवसेनेत गेले असतील, पटेल हे दोस्ती कायम ठेवून शिंदेसोबत जात आहेत. आम्हीही दोस्ती कायम ठेवत निवडणूक लढू, आम्हाला जो शिंदे गटाने तोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आम्ही व्यवस्थित उत्तर देऊ, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.

दरम्यान, "आमच्यामधील अजूनही चार ते पाच लोक पक्ष सोडून जातील त्यांच्यासोबत पैशाचा व्यवहार सुरू आहे. लोकसभेचा डाव काढण्याचा त्यांचा आमच्यासोबत प्रयत्न आहे. पण आम्ही खंबीर आहोत, हम डरते नाही. राजकुमार पटेल यांच्या विरोधामध्ये आम्ही दोस्ती कायम ठेवत त्यांच्या विरोधात प्रहारचा खंबीरपणे उमेदवार देऊ," असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NABARD Recruitment 2024 : १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ३५ हजर रुपये पगार अन् बँकेत नोकरी, आजच अर्ज करा

Mumbai News: केंद्रात, राज्यात तुमचे सरकार, छत्रपतींचे स्मारक का उभारले नाही? संभाजीराजे संतापले; मुंबईत हायहोल्टेज ड्रामा

Beed Crime : ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; फरार शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

Bigg Boss Grand Finale : 'तौबा-तौबा' अन् 'झापुक झुपूक'ची रंगणार जुगलबंदी; अभिजीत-सूरजचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

Durga Ashtami 2024 : नवरात्रीत अष्टमीला बनतोय महासंयोग; 'या' ४ राशी बनणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT