Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

CM Eknath shinde News : यंदा विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंची कसोटी असणार आहे. पक्षप्रमुख म्हणून यशापयाशाची जबाबदारी असणार आहे. तर त्यांना 50 आमदार निवडून आणण्याचे आव्हान आहे.
विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? वाचा
CM eknath shinde Saam Tv
Published On

मुंबई : यंदाची विधानसभा निवडणूक अनेक दिग्गज नेत्यांसाठी प्रतिष्ठेची आहे. शिवसेनेत बंड करुन स्वतंत्र चूल मांडलेल्या एकनाथ शिंदेंची तर ही कसोटी असणार आहे. यावेळची निवडणूक मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. यावेळी शिंदेंच्या शिवसेनेबरोबर भाजप आहे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. पण, शिवसेना दुभंगलेली आहे. त्यामुळे जे काही यशापयश येईल त्याची जबाबदारी त्यांनाच स्वीकारावी लागणार आहे.

लोकसभेला चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आला आहे. लोकसभेपेक्षा खरी कसोटी विधानसभेला लागणार आहे. शिवसेनेचे ६३ आमदार होते. त्यापैकी ५० आमदार शिंदे यांच्याबरोबर आहेत. या प्रत्येक मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या पाठिशी शिंदेंनी ताकद लावली आहे. विरोधी उमेदवाराची डाळ शिजणार नाही, याची काळजी घेत आहेत.

विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? वाचा
Eknath Shinde Speech : आमचं सरकार आता लाडकं सरकार झालंय; पीएम मोदींसमोर CM शिंदे विरोधकांवर बरसले; पाहा व्हिडिओ

लाडकी बहिण योजनेनंतर राज्यातील जनतेमध्ये एक संदेश गेला आहे की मुख्यमंत्री म्हणून शिंदे भारी आहेत. ते मदत करतात. महत्त्वाचा मुद्दा आता उरतो तो की शिंदेच्या शिवसेनेला महायुतीत किती जागा मिळतील? शिंदे यांचे वाढचे प्रस्थ हे भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्याचा परिणाम जागावाटपात दिसू शकतो.

महायुतीचा विचार केला तर भाजपचे ११० उमेदवार निवडून आले आहेत. म्हणजेच भाजप किमान १६० जागा लढवू शकते, शिवसेना ७५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ६५ जागा लढवू शकते असा अंदाज आहे. काही झाले तरी भाजप सर्वाधिक जागा लढवून जिंकलेल्या जागा पुन्हा राखण्याचा प्रयत्न करणार हे आलेच. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना यावेळीही स्ट्राइक रेट वाढविण्यासोबतच अधिक जागा मिळणे गरजेचे आहे.

विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? वाचा
Sharad Pawar On Eknath Shinde: "मी कृषी मंत्री असताना कधी निर्यात शुल्क ४०% लावले नव्हते..."; CM शिंदेंच्या टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर

बदलापूर घटनेनंतर महायुती सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर गेले होते. ही घटना ठाणे जिल्ह्यात घडल्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी लक्ष्य करणे स्वाभाविक होते. परंतु कोणत्याही मुद्याचे विरोधकांना श्रेय जाऊ नये, याची दक्षता सत्ताधारी महायुती सरकार घेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com