Eknath Shinde Speech : आमचं सरकार आता लाडकं सरकार झालंय; पीएम मोदींसमोर CM शिंदे विरोधकांवर बरसले; पाहा व्हिडिओ

CM Eknath Shinde speech : ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्घाटन सोहळ्यातील कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे.
आमचं सरकार आता लाडकं सरकार झालंय; पीएम मोदींसमोर CM शिंदे कडाडले; पाहा व्हिडिओ
Eknath Shinde SpeechSaam tv
Published On

गणेश कवडे, साम टीव्ही प्रतिनिधी

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ठाण्यातील विकास प्रकल्पांचा पायाभरणी आणि उद्घाटन सोहळा पार पडत आहेत. या सोहळ्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विरोधकांना टोला लगावला. 'आमचं सरकार आता लाडकं सरकार झालंय, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे

देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय पंतप्रधान मोदी आज ठाण्यात आले आहेत. तुम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

ठाण्याला तलावाचे शहर म्हटलं जायचं. आज जनतेचा पूर आलाय, तो फक्त पीएम मोदी तुमच्यामुळे आला आहे.

मुंबई मेट्रो 3 चं काम बालहट्टामुळे प्रकल्प स्थगित केला. पण आम्ही दोन वर्षापूर्वी त्यांचा टांगा पलटी केला आहे.

आमचं सरकार आता लाडकं सरकार झालंय; पीएम मोदींसमोर CM शिंदे कडाडले; पाहा व्हिडिओ
Ramraje Naik Nimbalkar : 'रामराजे' जाणार, तुतारी फुंकणार? शरद पवारांचा अजित पवारांना पुन्हा मोठा धक्का!

आज अटल सेतू कोस्टलरोड पूर्ण होत आहेत. आमचे सरकार आता लाडके सरकार झाले आहे.

अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार बघा आणि आपले सरकार बघा. त्यांची अडीच वर्ष आणि आमचे सव्वा दोन वर्षांचं सरकार बघा. दूध का दूध पाणी का पाणी होईल. कोविडमध्ये रुग्णाची खिचडी खाणारे आमचं सरकार नाही.

पंतप्रधान मोदी फक्त गती आणि प्रगतीचे बोलतात. विकास आणि विश्वास ही मोदींची दोन रूपे आहे. मुंबई, ठाणे रायगडसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे.

ठाणे ते मुंबई हा प्रवास सुसाट होणार आहे. आम्ही विरोधकांना कामातून उत्तर देऊ. काही लोक टीका करतात. माझ्या समोर बसलेल्या या देवी, दुर्गा या असुरांचा नाश करेल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातील मुद्दे

मेट्रो 3 कुणाच्या तरी गर्वाचे हरण करणारी आहे. महाविकास आघाडी सरकार आले, तेव्हा स्थगिती देण्यात आली.

उद्धव ठाकरे यांचा काय इगो दुखावला माहीत नाही, त्यांनी स्थगिती दिली. एकनाथ शिंदेचे सरकार आलं आणि मेट्रोचे काम सुरु झाले.

17 लाख प्रवासी यामधून प्रवास करतील. ठाण्यात मेट्रो रिंग प्रोजेक्ट येत आहे. ईस्टर्न फ्री वे आता ठाण्याला जोडणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com