Mumbai Local Train : मुंबईकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताय? उद्या रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

Mumbai Local Train Mega Block : मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल.
मुंबईकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताय? उद्या रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक
Mumbai Local train Latest NewsSaam TV
Published On

ऐन नवरात्री उत्सवात मुंबईकरांच्या प्रवासाचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण, विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वेने उद्या म्हणजेच रविवारी (ता ६) तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक कालावधीत काही लोकल उशिराने धावणार असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचं नियोजन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताय? उद्या रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक
Mumbai Local Train : लोकलच्या वाहतुकीत मोठे फेरबदल, तब्बल 175 रेल्वेगाड्या तडकाफडकी रद्द; नेमकं कारण काय?

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत हा मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद लोकल ठाणे – कल्याणदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार येईल.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर

हार्बर मार्गावरील पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असेल. सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल /बेलापूर अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहतील. ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल – ठाणे लोकल सेवा देखील बंद राहतील.

मात्र, असं असलं तरी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान, बेलापूर, नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गिका लोकल सेवा उपलब्ध असेल. दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावरही शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल.

मुंबईकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताय? उद्या रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक
Pune Crime: पुण्यात 'लाडक्या बहिणी' असुरक्षित, ७ महिन्यांत २६५ बलात्काराच्या घटना; आरोपींवर कारवाई कधी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com