Ramraje Naik Nimbalkar : 'रामराजे' जाणार, तुतारी फुंकणार? शरद पवारांचा अजित पवारांना पुन्हा मोठा धक्का!

Ramraje Naik Nimbalkar news in marathi : विधानसभेआधी अजित पवारांना धक्क्यावर धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. साताऱ्यातील रामराजे निंबाळकर हे अजित पवारांची साथ सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 'रामराजे' जाणार, तुतारी फुंकणार? शरद पवारांचा अजित पवारांना पुन्हा मोठा धक्का!
Ramraje Naik NimbalkarSaam tv
Published On

Ramraje Naik Nimbalkar News: अजित पवारांना आणखी एक धक्का मिळण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. निंबाळकर फलटणमध्ये लवकरच मेळावा घेऊन कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहे. त्यानंतर रामराजे त्यांची भूमिका जाहीर करणार आहे. रामराजे यांनी शरद पवारांना साथ दिल्यास विधानसभेआधी पुन्हा एकदा अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

कोण आहेत रामराजे निबांळकर?

विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे सासरे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार गटात नाराज असल्याचं बोललं जात आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे फलटणमधून विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, अजित पवारांनी दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेले रामराजे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. रामराजे हे अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आहेत. रामराजे हे २०१५ ते २०१६ आणि २०१६ ते ७ जुलै २०२२ या कालावधीत विधान परिषदेचे १३ अध्यक्ष होते.

 'रामराजे' जाणार, तुतारी फुंकणार? शरद पवारांचा अजित पवारांना पुन्हा मोठा धक्का!
Maharashtra Political News: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद न देण्याचं आधीच ठरलं होतं; बड्या आमदाराचा गौप्यस्फोट

नाराज विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. यासाठी ते फलटणमध्ये लवकरच मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करणार आहेत. काही दिवसांपूर्वी सोळशी येथील कार्यक्रमात अजित पवारांनी रामराजे नाईक निबांळकर यांचं भाषण सुरु असताना विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर नाराज झालेले आता रामराजे हे पुढील वाटचालीचा निर्णय घेणार आहेत.

 'रामराजे' जाणार, तुतारी फुंकणार? शरद पवारांचा अजित पवारांना पुन्हा मोठा धक्का!
Udayanraje-Ramraje Meeting : उदयनराजे-रामराजेंचे तुझ्या गळा माझ्या गळा... या भेटीमागे दडलंय काय? (पाहा व्हिडिओ)

रामराजे यांच्या नाराजीचं कारण काय?

फलटणमध्ये महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी अंतर्गत वाद लोकसभा निवडणुकी वेळी दिसला. भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात लोकसभा निवडणुकीत शाब्दिक वार झाल्याचं पाहायला मिळालं. या टीकेनंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती. तेव्हापासून दोन्ही नेत्यामध्ये कटुता पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com