Madha Loksabha: माढ्यात युतीधर्म पाळा.. अजित पवारांचे निर्देश; रामराजे निंबाळकर काय भूमिका घेणार?

Dhairyashil Mohite Patil Vs Ranjitsinh Naik Nimbalkar: माढा लोकसभा मतदार संघात रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम न करण्याची भूमिका घेतल्यानंतर अजित पवार यांनी तात्काळ देवगिरी निवासस्थानी सर्व पदाधिकाऱ्यांचे बैठक बोलावली होती.
Madha Lok Sabha Constituency
Madha Lok Sabha Constituency Saam TV

सूरज मसुरकर, मुंबई|ता. १२ एप्रिल २०२४

Madha Loksabha Constituency News:

माढा लोकसभा मतदार संघात अखेर धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीने नाराज झालेले धैर्यशील मोहिते पाटील १४ एप्रिलला शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असून ते तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत.

मात्र मोहिते पाटील यांच्यासोबतच रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर नाराज असलेले फलटणचे रामराजे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी युतीधर्म पाळण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.

माढ्याबाबत देवगिरीवर बैठक..

माढा लोकसभा मतदार संघात रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम न करण्याची भूमिका घेतल्यानंतर अजित पवार यांनी तात्काळ देवगिरी निवासस्थानी सर्व पदाधिकाऱ्यांचे बैठक बोलावली होती. या बैठकीला फलटणचे आमदार दीपक चव्हाण, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घाडगे या सोबतच नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळसकर उपस्थित होते.

युतीधर्म पाळा, अजित दादांचा आदेश...

या बैठकीमध्ये माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदार संघाबाबत चर्चा झाली. ज्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी माढा लोकसभा मतदारसंघात युतीधर्म पाळा, रणजितसिंह निंबाळकर यांचे काम करा, असे आदेश कार्यकर्ते तसेच नेत्यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Madha Lok Sabha Constituency
Maharashtra Politics: ' साहेब, तुम्ही ठरवाल ते धोरण'; PM मोदींना पाठिंबा दिल्यानंतर मनसैनिकाचं राज ठाकरेंना भावनिक पत्र

रामराजे काय भूमिका घेणार?

दरम्यान, माढ्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. रामराजे नाईक निंबाळकर यांची माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत नाराजी अद्याप कायम आहे.

अशातच रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जरी अजित पवार यांच्या गटात असले तरी काम मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांचे करावे अशी सूचना केल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे आता रामराजे नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Madha Lok Sabha Constituency
Ahmednagar : बायोगॅसने ५ जणांचा मृत्यू; मांजर अद्याप विहिरीतच, विखे पाटलांकडून मृतांच्या कुटुंबीयांची भेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com