Ahmednagar
AhmednagarSaam TV

Ahmednagar : बायोगॅसने ५ जणांचा मृत्यू; मांजर अद्याप विहिरीतच, विखे पाटलांकडून मृतांच्या कुटुंबीयांची भेट

Ahmednagar News : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवासा तालुक्यातील वाकडी येथे घडलेल्या घटनेतील काळे आणि पवार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन आणि घटना स्थळाची पाहणी केली.

सचिन बनसोडे

Radhakrishna Vikhe Patil :

दोन दिवसांपूर्वी नेवासा तालुक्यातील बायोगॅसच्या विहिरीत पडून ५ व्यक्तींचा मृत्यू झाला. मांजरीला वाचवताना ही दुर्घयटना घडली. यामध्ये एकाच कुटुंबातील चार तसेच शेतावर कामाला असलेला गडी अशा पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे.

Ahmednagar
Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला द्या, अन्यथा काम करणार नाही; BJP कार्यकर्त्यांचा इशारा

नेवासा तालुक्यातील वाकडी येथे बायोगॅसच्या विहिरीत पडलेल्या मांजराला वाचवताना सहा पैकी पाच जणांचा आपले प्राण गमवावे लागले. राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवासा तालुक्यातील वाकडी येथे घडलेल्या घटनेतील काळे आणि पवार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन आणि घटना स्थळाची पाहणी केली.

झालेली घटना दुर्दैवी असून सध्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने काही अडचणी आहेत. मात्र तरीही निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन संबंधित कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पाठवू असे विखे पाटील म्हणालेत.

दरम्यान, ज्या मांजराला वाचवण्याच्या प्रयत्नात पाच जणांचा मृत्यू झाला ते मांजर अद्यापही विहिरीतील कपारीत जिवंत अडकले आहे. बायोगॅसच्या विहिरीत मृत्यूचे तांडव घडल्याने या मांजराला वाचवण्यासाठी कुणीही पुढे येत नाहीये.

Ahmednagar
BJP Candidate List: भाजप उमेदवारांची ११ वी यादी जाहीर! महाराष्ट्रातील जागांची घोषणा नाहीचं; सातारा- रत्नागिरीबाबत सस्पेन्स कायम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com