BJP Candidate List: भाजप उमेदवारांची ११ वी यादी जाहीर! महाराष्ट्रातील जागांची घोषणा नाहीचं; सातारा- रत्नागिरीबाबत सस्पेन्स कायम

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024 | BJP Candidate List: भाजपने उमेदवारांची ११ वी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील एकाच उमेदवाराची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील जागांचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.
BJP Announced 11th Candidate List: Only One Candidate Selected From Bhadohi Loksabha Constituency
BJP Announced 11th Candidate List: Only One Candidate Selected From Bhadohi Loksabha ConstituencySaam Tv

Uttar Pradesh BJP 11th Lok Sabha Candidate List:

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीला 8 दिवस बाकी आहेत, त्याआधी भाजपने उमेदवारांची ११ वी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील एकाच उमेदवाराची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील जागांचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.

भारतीय जनता पक्षाकडून (BJP) लोकसभा उमेदवारांची ११ वी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकाच उमेदवाराची घोषणा केली आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील भदोही लोकसभा मतदारसंघातून डॉ. विनोद कुमार बिंद यांना तिकीट दिले आहे. भाजपने आतापर्यंत उत्तर प्रदेशातील 71 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

कैसरगंज, रायबरेली, देवरिया आणि फिरोजाबाद लोकसभा जागांसाठी उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. कैसरगंजमध्ये विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. काल भाजपने 10वी यादी तयार केली होती. ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील 7 जागांसाठी उमेदवार तर पश्चिम बंगाल आणि चंदीगडमधील प्रत्येकी एका उमेदवाराची घोषणा करण्यात आली होती.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

BJP Announced 11th Candidate List: Only One Candidate Selected From Bhadohi Loksabha Constituency
Maharashtra Politics: महायुतीचं ९ जागांवरून घोडं अडलं; जागावाटप आणि उमेदवारी जाहीर करण्यात मविआची सरशी

भारतीय जनता पक्षाच्या ११ व्या यादीमध्येही महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघाचा समावेश नाही. भाजपकडून साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसलेंची (Udayanraje Bhosale) उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तसेच रत्नागिरीमध्ये नारायण राणेंच्या नावाची चर्चा आहे.मात्र अद्यापही याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसल्याने सस्पेन्स कायम आहे. (Maharashtra Loksabha Election)

BJP Announced 11th Candidate List: Only One Candidate Selected From Bhadohi Loksabha Constituency
Vijay Wadettiwar : गडचिरोलीत भाजपला लीड मिळवून दाखवा; वडेट्टीवार यांचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना आव्हान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com