Maharashtra Politics: महायुतीचं ९ जागांवरून घोडं अडलं; जागावाटप आणि उमेदवारी जाहीर करण्यात मविआची सरशी

Maharashtra Political News : लोकसभेच्या रणधुमाळीत जागावाटप आणि उमेदवार जाहीर करण्यावरून महाविकास आघाडीने महायुतीवर सरशी घेतल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीचे ३ उमेदवार घोषित करायचे बाकी आहेत. तर महायुतीचा ९ जागांचा तिढा कायम आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam tv

सुनील काळे, मुंबई

Maharashtra lok Sabha Election :

देशासहित राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीने काही दिवसांपूर्वी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. मात्र, दुसरीकडे महायुतीचं ९ जागांवरून जागावाटपाचं घोडं अडलं आहे. त्यामुळे या रणधुमाळीत जागावाटप आणि उमेदवार जाहीर करण्यात महाविकास आघाडीने महायुतीवर सरशी घेतल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीचे ३ उमेदवार घोषित करायचे बाकी आहेत. तर महायुतीचा ९ जागांचा तिढा कायम आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीची उत्सुकता लोकांमध्ये वाढू लागली आहे. राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्राता सभांचा धडाका लावला आहे. मात्र, महाविकास आघाडीचा ९ जागांचा गुंता कायम आहे.

Maharashtra Politics
Pune Police: तृतीयपंथींना यापुढे सिग्नलवर पैसे मागता येणार नाही, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

महाविकास आघाडीने फक्त तीन उमेदवार घोषित करणे बाकी आहे. या तीन जागांवरील उमेदवारांपैकी दोन जागा काँग्रेसच्या तर एक जागा पवार गटाची आहे. या जागांमध्ये माढा, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई या जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतिक्षेच्या यादीत आहे.

Maharashtra Politics
Pooja Tadas News: लोखंडी रॉडने मारहाण; मला बेघर केलं... भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या सूनेचे खळबळजनक आरोप!

दुसरीकडे महायुतीत ९ जागांवरील तिढा कायम आहे.कुठल्या जागा कोणी लढवायच्या, यावरून महायुतीत वाद असल्याचे समोर आले आहे. महायुतीतील ९ मतदारसंघाच्या ९ मतदारसंघाच्या अजूनही चर्चा सुरु राहील. या ९ जागांमध्ये ठाणे, नाशिक, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, संभाजीनगर या जागांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com