Pune Police: तृतीयपंथींना यापुढे सिग्नलवर पैसे मागता येणार नाही, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

Pune Police Big Decision On Transgender: पुण्यातील तृतीयपंथींबाबत पोलिसांनी (Pune Police) मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यामध्ये यापुढे तृतीयपंथींना सिग्नलवर पैसे मागता येणार नाही. यासंदर्भात पुणे पोलिसांनी तृतीयपंथींवर काही निर्बंध लादले आहेत.
Pune  Transgender
Pune Police Big Decision On TransgenderSaam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

Pune Transgender:

राज्यातील अनेक शहरांमध्ये रस्त्यावरील सिग्नलवर तृतीयपंथी पैसे मागताना दिसतात. अनेकदा पैसे मागताना तृतीयपंथींकडून जबरदस्ती करताना दिसतात. त्यामुळे वाहन चालकांना त्रास होतो. अशामध्ये पुण्यातील तृतीयपंथींबाबत पोलिसांनी (Pune Police) मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यामध्ये यापुढे तृतीयपंथींना सिग्नलवर पैसे मागता येणार नाही. यासंदर्भात पुणे पोलिसांनी तृतीयपंथींवर काही निर्बंध लादले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तृतीयपंथींवर पुणे पोलिसांकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तृतीयपंथींना सिग्नलवर पैसे मागता येणार नाही. याबाबत पुणे पोलिसांनी निर्णय घेतला आहे. पुणे शहरातील अनेक सिग्नलवर तृतीयपंथी नागरिकांकडून पैसे मागतात. यामुळे नागरिकांना त्रास होतो. या नागरिकांकडून पुणे पोलिसांकडे अनेक तक्रार आल्या आहेत. या तक्रारींनंतर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला.

Pune  Transgender
CM Eknath Shinde: विरोधक मोदीद्वेषाने पीडित, त्यांच्या अहंकाराची लंका जनता जाळेल; एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य

तृतीयपंथी यांच्याबाबत पुणे पोलिसांनी आदेश जाहीर केले आहेत. सिग्नलवर उभे असलेल्या वाहनांना जर त्रास दिला तर या तृतीयपंथीवर होणार पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. फक्त सिग्नलबाबतच नाही तर घरगुती समारंभमध्ये देखील आमंत्रणशिवाय हजेरी लावण्यास तृतीयपंथींना प्रतिबंध करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी आजपासून हे आदेश जारी केले आहेत. जर पुणे पोलिसांच्या आदेशांचे तृतीयपंथींनी पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

Pune  Transgender
Pm Modi Speech: काँग्रेसने एक देश एक संविधान लागू होऊ दिलं नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com