Vijay Wadettiwar : गडचिरोलीत भाजपला लीड मिळवून दाखवा; वडेट्टीवार यांचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना आव्हान

Vijay Wadettiwar On Dharamraobaba Aatram : दुसऱ्याला बदनाम करु नका. स्वतः बेइमानी करायची, पक्ष फोडायचे, पाप करायचे त्यावर पांघरूण घालण्यासाठी दुसऱ्याला बदनाम करायचे, अशा खरमरीत शब्दांत वडेट्टीवारांनी टीका केली आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSaam TV

मंगेश बांदेकर

Gadchiroli Chimur Lok Sabha :

गडचिरोली मतदारसंघ हा काँग्रेसमय झाला आहे. या मतदारसंघात भाजपचा पराभव दिसत आहे. भाजपचा पराभव झाला तर धर्मराव बाबा यांचे मंत्रीपद जाईल म्हणून माझ्यावर आरोप करत आहेत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

Vijay Wadettiwar
Bihar Lok Sabha: आरजेडीने जाहीर केली 22 उमेदवारांची यादी, लालूंच्या 2 मुलींना तिकीट

गडचिरोलीमध्ये मी तळ ठोकून आहे, म्हणून मला त्रास देण्यासाठी हे आरोप करत आहेत. धर्मराव आत्राम यांना माझे आव्हान आहे त्यांनी त्यांच्या मतदारसंघात भाजपला लीड मिळवून द्यावी. यांच्यापुढे चर्चा झाली तर आत्राम यांची नार्कोटेस्ट करा, असेही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

तुम्हाला उद्या उमेदवारी मिळणार का माहित नाही, लोकसभेत तुमची गोची केली. तिथे जाऊन गुलाम होऊन जगत आहेत. दुसऱ्याला बदनाम करु नका. स्वतः बेइमानी करायची, पक्ष फोडायचे, पाप करायचे त्यावर पांघरूण घालण्यासाठी दुसऱ्याला बदनाम करायचे, हे बिनबुडाचे आहे, अशा खरमरीत शब्दांत वडेट्टीवारांनी टीका केली आहे.

गडचिरोली आम्ही जिंकत आहोत, सर्व सूत्र हातात घेतली आहेत. पराभव समोर दिसत आहे म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम दिसत आहे. हे नावाला राजे आहेत, त्यामुळे हे भाजपसमोर झुकले आणि यांची इच्छा असेल इतरांनी झुकावे. पण आम्ही स्वाभिमानी आहोत, काँग्रेसला जिंकून देऊ 4 जूनला कळेल गडचिरोलीमध्ये काँग्रेस राजा आहे आणि यांची जागा यांना दिसेल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Vijay Wadettiwar
Awaaz Maharashtracha | आवाज महाराष्ट्राचा | Gadchiroli Lok Sabha | गडचिरोली लोकसभा| Marathi News

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com