Bacchu Kadu News Saam Tv
महाराष्ट्र

Bacchu Kadu: 'मला बदनामीची पर्वा नाही, गुवाहाटीत...'; 'खोके खोके' टीका करणाऱ्यांना बच्चू कडू यांचं प्रत्युत्तर

Bacchu Kadu News: आम्ही गुवाहाटीला नसतो गेलो, तर आम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालं नसतं, अशा शब्दात टीकाकार विरोधकांना बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

Bacchu Kadu News:

प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी 'खोके खोके' टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'आमची बदनामी केली जात आहे. मला बदनामीची पर्वा नाही. आम्ही गुवाहाटीला नसतो गेलो, तर आम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालं नसतं, अशा शब्दात टीकाकार विरोधकांना बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

जळगावमध्ये दिव्यांग विभागाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी आमदार बच्चू कडू उपस्थित होते. यावेळी भाषणात बच्चू कडू यांनी त्यांचं मत मांडत भूमिका स्पष्ट केली.

बच्चू कडू म्हणाले, 'गुवाहाटीला गेलो म्हणून इतके बदनाम झालो की, लोक बाहेर पडले की खोके घेतले म्हणून बोलतात. जिकडे गेलो तिकडे खोके घेऊन आला, खोके घेऊन आलास असं आम्हाला म्हणतात. आमची बदनामी करण्यात येते. मला त्याची परवा नाही. गुवाहाटीला गेल्यामुळे दिव्यांग मंत्रालय मिळालं'.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा घटनाक्रम देखील बच्चू कडू यांनी सांगितलं. बच्चू कडू म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन वर्ष राहिलो. मात्र, दिव्यांग मंत्रालय झालं नाही. मी एकनाथ शिंदे यांना अट घातली होती. जर तु्म्ही मला दिव्यांग मंत्रालय देत असाल तरच मी तुमच्यासोबत येतो, नाहीतर गाडीतून उतरतो. त्यांनी त्यांचा शब्द पाळला. आज दिव्यांग मंत्रालय मिळालं आहे'.

'दुसऱ्या वेळी जेव्हा गुवाहाटीला गेलो, त्यावेळी मी एकनाथ शिंदे यांना दिव्यांग मंत्रालयाबाबत आठवण करून दिली होती. त्यानंतर ते दिव्यांग मंत्रालय आपल्याला मिळालं असेही यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT