काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी तेलंगणामध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्या म्हणाले की, त्यांचं स्वप्न आहे की, राज्यात त्यांच्या पक्षाची सरकार स्थापन व्हावी. जी समाजातील सर्व घटकांसाठी काम करेल.
हैदराबादजवळील तुक्कुगुडा येथे जाहीर सभेला संबोधित करताना सोनिया गांधी म्हणाल्या, ''आम्ही 6 गॅरंटी जाहीर करत आहोत आणि प्रत्येक गॅरंटी पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.'' त्यांनी ‘महालक्ष्मी’ योजनेची गॅरंटी जाहीर केली. याअंतर्गत काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर तेलंगणातील महिलांना दरमहा २५०० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
सोनिया गांधी यांनी ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर आणि महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये मोफत प्रवास करण्याची घोषणाही केली आहे. सोनिया गांधी यांनी जनतेला काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. त्याचवेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हैदराबादच्या प्रचारसभेत बोलताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावरही निशाणा साधला. (Latest Marathi News)
ते म्हणाले की, प्रत्येक विरोधी पक्षनेत्यावर काही ना काही केस असते. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हे सगळे विरोधी नेत्यांच्या मागे लागले आहे. पण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवर एकही केस नाही, एआयएमआयएमच्या नेत्यांवर एकही केस नाही.
राहुल गांधी म्हणाले, ''नरेंद्र मोदीजी कधीही आपल्या लोकांवर हल्ला करत नाहीत. ते येथील मुख्यमंत्री आणि एआयएमआयएमला आपले मानतात, त्यामुळे त्यांच्यावर कोणताही खटला नाही. त्यांनी भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडीत काढले असले, तरी त्यांच्यावर एकही गुन्हा नाही.''
ते म्हणाले, ''तेलंगणात काँग्रेस पक्ष केवळ बीआरएस पक्षाविरुद्धच लढत नाही, तर काँग्रेस बीआरएस, भाजप, एआयएमआयएमविरोधात लढत आहे. ते स्वतःला वेगळे पक्ष म्हणवून घेतात. पण ते सर्व एकत्र काम करत आहेत. जेव्हा जेव्हा भाजपला बीआरएसची गरज होती, तेव्हा तेथील लोकांनी पूर्ण पाठिंबा दिला.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.