Bachchu Kadu News Saam Tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu News: 'शेतकऱ्यांना द्यायला कमी पडल्यानेच आरक्षणाचा मुद्दा...' आमदार बच्चू कडूंचा सरकारवर प्रहार

Satara News: "माझ्यासाठी दिव्यांग मंत्रालय मोठं आहे. त्यामुळे मी कोणतेही मंत्रीपद घेणार नसून मंत्रीपदाची मला गरज नाही.. असेही बच्चू कडू म्हणाले.

ओंकार कदम

Satara News:

"माझ्यासाठी दिव्यांग मंत्रालय मोठं आहे. त्यामुळे मी कोणतेही मंत्रीपद घेणार नसून मंत्रीपदाची मला गरज नाही.." असे प्रतिपादन प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी साताऱ्यामधील कार्यक्रमात बोलताना केले. तसेच सरकार शेतकऱ्यांसाठी कमी पडल्यानेच आरक्षणाचा मुद्दा पुढे आणल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान सातारा (Satara) येथे पार पडले. यामध्ये जिल्ह्यातील हजारो दिव्यांग सहभागी झाले होते. या मेळाव्याला प्रहारचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

"एका तालुक्यात सात हजार दिव्यांग आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडु शकते असे म्हणत दिव्यांगांच्याकडे दुर्लक्ष करणारे नेते निवडणुकीत पडतील," असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. तसेच "मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, मात्र मी मंत्रीपद घेणार नाही माझ्याकडे एवढे मोठे दिव्यांग मंत्रालय दिलं आहे त्यामुळे मला त्याची गरजही नाही," असेही बच्चू कडू म्हणाले.

सरकारवर टीका...

दरम्यान, यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले. शेतकरी प्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्यानेच आरक्षणाचा मुद्दा पुढे केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. येणा-या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील माण खटाव मतदारसंघात स्वबळावर उमेदवार देणार असल्याचेही बच्चू कडू यांनी सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माता न तू वैरिणी! चिमुकलीला अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच आई...; ठाण्यातील खळबळजनक घटना|VIDEO

Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

MNS : मराठी असूनही ते एका मराठी मुलीलाच टार्गेट करत आहेत, मनसे नेत्याच्या मुलाकडून शिवीगाळ; इन्फ्लूएन्सरने सांगितली आपबिती

Maharashtra Live News Update रायगडच्‍या कोर्लई किनारयावरील संशयीत बोटीसंदर्भात महत्‍वपूर्ण खुलासा

Blood Pressure: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी वरदान ठरेल 'ही' एक गोष्ट

SCROLL FOR NEXT